शॉपमॅटिकने E-Commerce स्वीकारण्यासाठी व्यवसायांना होस्टिंग शुल्क केले माफ

शॉपमॅटिकने ग्राहकांसाठी आपल्या व्यावहारिक खेळीचे कसब दाखवत मासिक ५० रुपयांचे / १ डॉलर होस्टिंग शुल्क कायमस्वरूपी हटविले आहे. ९ सप्टेंबर २०२१ पासून, हे व्यासपीठ ऑनलाइन (Online Platform) व्यवहारासाठी व्यापाऱ्यांना (businessmen) केवळ ३% शुल्क आकारेल ज्यामुळे व्यवसायांना ईकॉमर्स स्वीकारणे अधिक सोपे होईल.

  • येत्या काही वर्षांत ५ दशलक्ष ग्राहकांवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे

मुंबई : आंतरराष्ट्रीय ई कॉमर्सचे (International E Commerce) सक्षमीकरण करणारे शॉपमॅटिक (Shopmatic) आपल्या ‘इन्स्पायरिंग एंटरप्रेनरशिप प्रोग्राम’ (Inspiring Entrepreneurship Program) द्वारे जास्तीत जास्त उद्योजकांना आणि एसएमईंना ऑनलाइन जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

शॉपमॅटिकने ग्राहकांसाठी आपल्या व्यावहारिक खेळीचे कसब दाखवत मासिक ५० रुपयांचे / १ डॉलर होस्टिंग शुल्क कायमस्वरूपी हटविले आहे. ९ सप्टेंबर २०२१ पासून, हे व्यासपीठ ऑनलाइन (Online Platform) व्यवहारासाठी व्यापाऱ्यांना (businessmen) केवळ ३% शुल्क आकारेल ज्यामुळे व्यवसायांना ईकॉमर्स स्वीकारणे अधिक सोपे होईल.

शॉपमॅटिक पुढील दोन वर्षांत ५ दशलक्ष ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि भारतातील ईकॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. उद्योजकांसाठी कायमस्वरूपी ऑनलाईन स्टोअर्ससाठी (Online Stores) कोणतेही शुल्क न आकारण्याचा कंपनीचा निर्णय हा भारतातील महत्वकांक्षी उद्योजक आणि व्यवसायांना सहजतेने ऑनलाईन जाण्यास मदत करण्याच्या शॉपमॅटिकच्या प्रयत्नांचा पुरावा आहे.

शॉपमॅटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक अनुराग अवुला म्हणाले, “आमचे विघटनकारी व्यवहारिक मॉडेल,भारतीय उद्योजक आणि त्यांच्या आवडीनिवडी सखोलपणे समजून घेत ५० रुपये होस्टिंग शुल्क आणि प्रत्येक यशस्वी व्यवहारावर ३% आकारासह सुरू करण्यात आले. आता, आमचे ग्राहक जसजसे चोखंदळ आणि तंत्रज्ञान अग्रेसर होतील, तसतसे आम्ही आणखी एक अभूतपूर्व बदल करणार आहोत. ओपन नेटवर्किंगच्या भावनेने आम्ही सर्व व्यवसाय आणि उद्योजकांना ऑनलाइन जाण्यासाठी आणि शॉपमॅटिकच्या सर्वव्यापी वैशिष्ट्यांचे पूर्ण लाभ घेण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. जेणेकरून त्यांची व्यवसाय वाढ जास्तीत जास्त वाढेल; जेव्हा ते कमावतील तेव्हाच ते पैसे देतील. आम्हाला विश्वास आहे की या निर्णयामुळे भारताच्या वाढत्या एसएमई लँडस्केपच्या वाढीस आणि विकासात मोठे योगदान मिळेल, ज्यामुळे असंख्य इच्छुक व्यवसाय मालकांना ऑनलाइन वाढ आणि यशाकडे घेऊन जाता येईल.”