संगमनेरमधे चक्क घोड्याचं घातलं श्राद्ध ; पंचपक्वान्नाचं गावकऱ्यांना दिलं जेवण

'आमच्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे'. अशी भावना दत्तू मोकळ यांनी यावेळी दिली. 'लहान बाळाप्रमाणे त्याचे संगोपन केले. आम्ही त्याला लहानाचं मोठं केलं व आमच्या घरातील एक सदस्य होता. आता त्याच्या स्मरणार्थ आम्ही छोटे स्मारक बांधणार आहोत. जेणेकरून त्याची आठवण कायम येत राहील अशा भावना यावेळी मोकळ परिवाराने व्यक्त केल्या.

    अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथे चक्क घोड्याचे श्राद्ध घातले आहे. यामुळे तालुक्यात चर्चा झाली आहे. प्राण्यांविषयी आपुलकी व माणुसकीची भावना घोड्याच्या माध्यमातून बघायला मिळाली. पवन या घोड्याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे मोकळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे त्यांनी चक्क घोड्याचे श्रद्धा घातले व आपल्या घरामध्ये दहा दिवसांचा दुखवटा करत त्यांनी कीर्तनाचे आयोजन केले होते.

    प्राणी पक्षी पाळणाऱ्यांचा त्यांच्या प्राण्यांवर फार प्रेम असंत. त्या मुक्या प्राणीही आपल्या मालकांना जीव लावतात. त्यामुळे काही कारणामुळे जरं ते आपल्याला सोडून गेले तर फार दु:ख होतं. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द मोकळ कुटुंबात पाहायला मिळाला. पांडुरंग बाबुराव मोकळ यांचा पवन नावाचा पाळिव घोडा होता. स्वत:च्या मुलाप्रमाणे त्यांनी त्याला जपलं. मात्र त्याच्या अकाली निधनामुळे मोकळ कुटुबं पार खचून गेलं. त्यामुळे त्यांनी आपल्या घरातील व्यक्ती गेल्याप्रमाणे त्यांनी चक्क घोड्याचे श्रद्धा घातले व आपल्या घरामध्ये दहा दिवसांचा दुखवटा करत त्यांनी कीर्तनाचे आयोजन केले होते.

    ‘आमच्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे’. अशी भावना दत्तू मोकळ यांनी यावेळी दिली. ‘लहान बाळाप्रमाणे त्याचे संगोपन केले. आम्ही त्याला लहानाचं मोठं केलं व आमच्या घरातील एक सदस्य होता. आता त्याच्या स्मरणार्थ आम्ही छोटे स्मारक बांधणार आहोत. जेणेकरून त्याची आठवण कायम येत राहील अशा भावना यावेळी मोकळ परिवाराने व्यक्त केल्या.