…म्हणून पाण्यात मिसळल्यावर सिमेंट होते टणक; जाणून घ्या रंजक माहिती

कॅल्शियम हायड्रॉक्साइडचे कण या मिश्रणातील पाणी दूर करतात. त्यामुळे जसजसे हे मिश्रण तयार होत जाते तसतसा या प्रक्रियेचा वेग मंदावत जातो आणि शेवटी सिमेंटच्या मिश्रणात..

    लाइमस्टोन आणि क्ले यांचे मिश्रण म्हणजे सिमेंट. ‘सिमेंट काँक्रिट’ अशी संज्ञा बरेच वेळा एकत्र वापरली जाते. पण ते दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. काँक्रिट म्हणजेच टणक बनवण्यासाठी आणि ते एकत्र बांधून ठेवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ. सिमेंटमध्ये असलेल्या ट्रायकॅल्शियम सिलिकेटची पाण्याबरोबर रासायनिक प्रक्रिया होते.

    सजलीकरणाच्या प्रक्रियेत कॅल्शियम, हायड्रॉक्साइड आयन्स आणि पुष्कळ उष्णता बाहेर पडते. जोपर्यंत ते मिश्रण परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत उष्णता ती प्रक्रिया चालू ठेवते. कॅल्शियम हायड्रॉक्साइडचे कण या मिश्रणातील पाणी दूर करतात. त्यामुळे जसजसे हे मिश्रण तयार होत जाते तसतसा या प्रक्रियेचा वेग मंदावत जातो आणि शेवटी सिमेंटच्या मिश्रणात पाण्याचे प्रमाण जितके कमी तितके ते सिमेंट अधिक टणक होते.