
मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मेट्रो ७ अंधेरी - पूर्व ते दहिसर आणि मेट्रो - २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिकांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील मेट्रोचे ( Two Metro routes will start in Mumbai ) दोन मार्ग सुरू होणार आहेत. मुंबई मेट्रो ७ अंधेरी – पूर्व ते दहिसर आणि मेट्रो – २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सोबतच उद्घाटन कार्यक्रमात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.
मेट्रो ७ अंधेरी – पूर्व ते दहिसर आणि मेट्रो – २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिका मुंबईकरांसाठी खूप महत्वाच्या आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांचे भूमिपूजन ऑक्टोबर २०१५ ला झाले होते. तर, प्रत्यक्षात कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली होती. कोरोनमुळे या दोन्ही मेट्रो मार्गिकांचे काम संथ गतीने सुरू होते. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच मेट्रो ७ अंधेरी – पूर्व ते दहिसर आणि मेट्रो – २ अ डीएनए नगर ते दहिसर या दोन मार्गिकांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. आता दोन्ही मार्गांवरील सीएमआरएसच्या पथकाकडून सुरक्षा चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे, बहुप्रतिक्षित पश्चिम उपनगरातील मेट्रो आता धावणार असून, यानिमित्ताने मुंबईचा प्रवास आणखी सुकर होणार आहे.
मेट्रो – २ अ डीएनए नगर ते दहिसर : मेट्रो – २ अ डीएनए नगर ते दहिसरपर्यंत असणार आहेत. या १८.५ किलोमीटर मार्गिकेच्या बांधकामाला लागणारा खर्च ६ हजार ४१० कोटी रुपये इतका आहे. यात आनंदनगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीनगर, कामराजनगर, चारकोपर, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्कसह एकूण १६ स्थानके असणार आहेत.