१७ नोव्हेंबर : १९९४ साली रशियाच्या मीर या अंतराळ स्थानकाने पृथ्वीभोवती ५० हजार फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

    घटना.

    १८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्‍वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.

    १८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्‍या सुएझ कालव्याचे उद्‍घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.

    १९३२: तिसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

    १९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.

    १९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.

    १९९२: देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

    १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

    १९९४: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्‍या पूर्ण करून नवा विक्रम केला.

    १९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या नॅशनल अ‍ॅकेडमी ऑफ सायन्सेस चे फेलो म्हणून निवड.