वैभव तत्ववादी अभिनित ‘ग्रे’ चित्रपटास प्रेक्षकांची विशेष पसंती…!

'ग्रे' चित्रपटात अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी असून तो 'सिद्धांत' या एका धर्मादिकारी नामक प्रामाणिक पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या अमेरिकेहीतून परतणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे.

    रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘ग्रे’ (Grey) हा चित्रपट (Movie) १ ऑक्टोबर रोजी झी5 प्रीमियरवर प्रदर्शित झाला आहे. एका खूप मोठ्या काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या रहस्यमय थरारक अशा वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाच्या विषयामुळे ‘ग्रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.

    ‘ग्रे’ चित्रपटात अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी असून तो ‘सिद्धांत’ या एका धर्मादिकारी नामक प्रामाणिक पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या अमेरिकेहीतून परतणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. ‘ग्रे’ ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बादल्याच्या बदल्याची कथा आहे. वैभवने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरीही या चित्रपटातील ‘सिद्धांत’ ने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळतात. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.