सरकारी शाळेतील गरीब मुलांची गैरहजेरी कमी करण्यासाठी केंद्र सरकार राबवणार ‘हा’ उपक्रम

ही योजना शिक्षण विभागाशी संबंधित आहे आणि या देशातील गरीब कुटुंबातून आलेल्या करोडो मुलांना पोषण योजनेचा लाभ दिला जाईल.

    नवी दिल्लीः  केंद्र सरकार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करणार आहे. या अंतर्गत देशातील कोट्यवधी मुलांना ५ वर्षे मोफत अन्न दिले जाणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या योजनेची माहिती दिली.

    ही योजना शिक्षण विभागाशी संबंधित आहे आणि या देशातील गरीब कुटुंबातून आलेल्या करोडो मुलांना पोषण योजनेचा लाभ दिला जाईल. यासाठी सरकारने अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही घेतलाय. सरकारी शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांसाठी ही योजना सुरू केली जाईल. त्याचे नाव प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे ठेवण्यात आले. शासकीय शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच या योजनेचा लाभ शासकीय अनुदानित शाळांमध्येही दिला जाईल.

    सरकारच्या मते, देशातील ११लाख २०हजार कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी १ लाख ७१ हजार कोटी रुपये खर्च केले जातील. देशातील करोडो मुलांना पोषण आहार मिळावा यासाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (पीएम पॉशन शक्ती निर्माण योजना) सुरू केली जात आहे.

    सरकार मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण देखील सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि हे लक्षात घेऊन ही नवीन योजना सुरू केली जात आहे. यामुळे शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल आणि त्यांचे शिक्षण आणि पोषण विकसित होईल. या योजनेच्या माध्यमातून शिक्षणातील ‘सामाजिक आणि लिंगभेद’ दूर करण्यास मदत होईल.