कार्यालयांचे भवितव्‍य: कर्मचारी, प्रमुखांना कायमस्‍वरूपी घरातून काम करण्‍याची सुविधा देणारे स्थिर व संकरित मॉडेल

कर्मचा-यांच्‍या सुरक्षित व लक्षवेधक कार्यालयासंदर्भातील अपेक्षा ठामपणे मांडत स्‍टीलकेस संशोधन निदर्शनास आणते की, ८५ टक्‍के भारतीय प्रमुखांची कार्यालय व घरातून काम करण्‍याला पसंती आहे.

  नवी दिल्ली : स्‍टीलकेसने आज सादर केलेला नवीन अहवाल निदर्शनास आणतो की, २०२० मध्‍ये बहुतांश कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अधिककरून घरातूनच काम केले आहे. ज्‍यामुळे व्‍यवसायांना उत्‍पादकता, सहभाग व नवोन्‍मेष्‍काराच्‍या संदर्भात लक्षणीय नुकसानाचा सामना करावा लागला आहे.

  स्‍टीलकेसने महामारीदरम्‍यान भारतासह १० देशांमध्‍ये संशोधन केले. या संशोधनामध्‍ये कर्मचारी, व्‍यवसाय प्रमुख आणि लाखो कामगारांचे प्रतिनिधित्‍व करणारे रिअल इस्‍टेट धोरणकर्ते अशा ३२,००० हून अधिक सहभागींचा समावेश होता.

  स्‍टीलकेसच्‍या ‘चेंजिंग एक्‍स्‍पेक्‍टेशन्‍स ॲण्‍ड दि फ्युचर ऑफ वर्क’ अहवालामध्‍ये भारतातील प्रतिसादकांनी मान्‍य केले की, वर्क-फ्रॉम-होमचे (डब्‍ल्‍यूएफएच) विविध फायदे होते, पण त्‍यामधून काही आव्‍हानांचा देखील सामना करावा लागला. सरासरी जागतिक स्‍तरावर ४१ टक्‍के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते सहभाग व उत्‍पादकतेवरील परिणामामुळे वर्क-फ्रॉम-होम बाबत असमाधानी होते. भारतामध्‍ये एकूण सहभाग व उत्‍पादकतेमध्‍ये अनुक्रमे १६ टक्‍के व ७ टक्‍क्‍यांनी घट झाली.

  लोक कार्यालयामध्‍ये परतण्‍यास उत्‍सुक असताना भारतातील निष्‍पत्तींनी डब्‍ल्‍यूएफएचचे दोन मुख्‍य लाभ दाखवले, ते म्‍हणजे आरोग्‍य व फिटनेस (३९ टक्‍के) आणि सुधारित अवधान (३३ टक्‍के). याउलट, लोकांनी त्‍यांच्‍या डब्‍ल्‍यूएफएच अनुभवाबाबत असमाधान देखील व्‍यक्‍त केले. यासाठी आयसोलेशनची भावना (२६.४ टक्‍के), निर्णय घेण्‍यामध्‍ये विलंब (२१.७ टक्‍के) आणि काम-जीवन संतुलनावर परिणाम (२०.४ टक्‍के) ही कारणे होती.

  जीवन सुरळीत होत असताना जागतिक स्‍तरावर फक्‍त २३ टक्‍के कर्मचारी पूर्ण-वेळ कार्यालयांमध्‍ये परततील, तर ७२ टक्‍के कर्मचारी संकरित कामकाज मॉडेलचा अवलंब करतील आणि फक्‍त ५ टक्‍के कर्मचारी घरातूनच काम करणे सुरू ठेवतील (जागतिक महामारीपासून फक्‍त २ टक्‍क्‍यांनी वाढ). अहवालाने निदर्शनास आणले की, अव्‍वल बाजारपेठांपैकी एक असलेल्‍या भारतातील कर्मचारी संकरित मॉडेलला पसंती देत आहेत. महामारीनंतरच्‍या अपेक्षांबाबत सांगताना बहुतांश भारतीय प्रमुखांनी (८५ टक्‍के) सांगितले की, ते त्‍यांच्‍या टीम्‍ससाठी अधिक संकरित कामकाजाची अपेक्षा करत होते. तुलनेत फक्‍त १२ टक्‍के प्रमुखांनी सांगितले की ते पुन्‍हा इन-ऑफिस-हेवी वर्क मॉडेलचा अवलंब करतील. तब्‍बल ९० टक्‍के प्रमुखांनी सांगितले की, त्‍यांना त्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्‍याची निवड व सुविधा देण्‍याची अपेक्षा आहे.

  कर्मचाऱ्यांनी व्‍यावसायिक वातावरणामध्‍ये काम (६१ टक्‍के), कंपनीशी पुन्‍हा संलग्‍न होणे (५६ टक्‍के) आणि सहकाऱ्यांशी जुडले जाणे (४९ टक्‍के) अशा विविध कारणांसाठी कार्यालयामध्‍ये परतण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. तसेच त्‍यांना कोविडनंतरच्‍या काळात कार्यालयीन स्थितीमध्‍ये बदल होण्‍याची देखील अपेक्षा होती. या संशोधनाने पाच महत्त्वपूर्ण घटकांना निदर्शनास आणले.

  सुरक्षितता:

  महामारीनंतरच्‍या विश्‍वामध्‍ये अनेकांसाठी सुरक्षितता ही प्रमुख समस्‍या आहे, तसेच सुरक्षितता नियमांचे पालन (८१ टक्‍के), हवेचा दर्जा (८० टक्‍के) आणि सुविधायुक्त स्‍वच्‍छता (७७ टक्‍के) यावर फोकस आहे.

  संबंध:

  सोशल डिस्‍टन्सिंग नियम असताना देखील लोकांची सहकाऱ्यांसोबत परस्‍परसंवाद साधण्‍याची इच्‍छा आहे. यामधून त्‍यांची समुदायाप्रती आपुलकीची भावना दिसून येते, ज्‍यामुळे उत्‍पादकता व सहभागाला चालना मिळेल.

  उत्‍पादकता:

  सहयोग, अध्‍ययन आणि साधनांची उपलब्‍धता या काही महत्त्वपूर्ण समस्‍या आहेत, ज्‍यांचा उत्‍पादकतेवर परिणाम होत आहे. ”तुम्‍ही भौतिकदृष्‍ट्या उपस्थित असाल तरच तुम्‍ही स्‍पष्‍टपणे बोलू शकता आणि तुम्‍हाला लोकांची देहबोली उत्तमपणे समजू शकते. माझ्या मते, आपण घरातून काम करताना फक्‍त पृष्ठभागांकडे पाहत राहतो,” असे संशोधनातील एक सहभागी म्‍हणाला.

  आरामदायी सुविधा:

  अत्‍यंत अस्‍वस्‍थता हा डब्‍ल्‍यूएचएफच्‍या प्रतिकूल परिणामांपैकी एक होता, ज्‍यामधून आरोग्‍यविषयक आजार व अवधानाचा अभाव अशा प्रतिकूल गोष्‍टी समोर आल्‍या. म्‍हणूनच अनेकांनी कार्यालयामधील उत्तम वातावरणामध्‍ये काम करण्‍याला प्राधान्‍य दिले.

  नियंत्रण:

  संशोधनाने निदर्शनास आणले की, ५४ टक्‍के कर्मचाऱ्यांची त्‍यांच्‍या कार्यालयातील फर्निचरमध्‍ये सुधारणा करण्‍याची सुविधा असण्‍याची इच्‍छा होती. पण फक्‍त ३८ टक्‍के कर्मचारी ही गोष्‍ट साध्‍य करू शकले. कर्मचा‌ऱ्यांची स्थिर व आरामदायी कार्यालयीन वातावरण आणि मर्यादांपलीकडे जाण्याच्‍या क्षमतेवर नियंत्रण ठेवण्‍याची इच्‍छा होती.

  भारत, सार्क, डिझाइन ॲप्‍लीकेशन-एपीएसी येथील स्‍टीलकेस एशिया-पॅसिफिकचे व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रवीण रावल म्‍हणाले, ”महामारीचा व्‍यवसाय कार्यसंचालनांवर अनपेक्षितरित्‍या परिणाम झाला, ज्‍यामुळे कंपन्यांना नवीन कामकाजाचे नियम व प्रक्रियांचा शोध घ्‍यावा लागला. २०२० मध्‍ये डब्‍ल्‍यूएफएचचे प्रमाण अधिक राहिले असले तरी कर्मचारी सध्‍या सुरू असलेल्‍या सार्वजनिक आरोग्‍यविषयक महामारीदरम्‍यान देखील कार्यालयामध्‍ये परतण्‍यास उत्‍सुक आहेत, कारण कार्यालय कर्मचाऱ्यांच्‍या सामजिक जीवनामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि घरातून काम करण्‍याची पद्धत कमी उपयुक्‍त आहे. स्‍टीलकेसचा अहवाल लोकांच्‍या गरजा आणि उत्तम कार्यसंचालन व सुधारित उत्‍पादकतेसाठी आवश्‍यकतांचा दृष्टिकोन सादर करतो. कंपन्‍यांनी त्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांना सुरक्षित व स्थिर कामाचे वातावरण देण्‍यासाठी त्‍यांच्‍या व्‍यवसाय प्राधान्‍यक्रमांमध्‍ये सुधारणा करण्‍याची गरज असेल.”

  संशोधनाबाबत

  महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्‍यापासून स्‍टीलकेस कंपन्‍यांना त्‍यांच्‍या कर्मचारीवर्गाच्‍या बाबतीत काय घडत आहे आणि त्‍याचा त्‍यांच्‍या व्‍यवसायावर होत असलेल्‍या परिणामाबाबत समजण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी सध्‍या सुरू असलेले संशोधन करण्‍याशी कटिबद्ध आहे. स्‍टीलकेस डेटामध्‍ये आठ प्रतिष्ठित व दर्जात्‍मक प्राथमिक संशोधनांमधील निष्‍पत्तींचा समावेश आहे. हे संशोधन कोविड-१९ महामारीचा काम, कर्मचारी व कार्यालयांवरील परिणामाचे मापन करण्‍यासाठी करण्‍यात आले. १० देशांमध्‍ये हे संशोधन करण्‍यात आले आणि या संशोधनामध्‍ये सामाजिक विज्ञानामधील पद्धतींचा वापर करत ३२,००० हून अधिक सहभागींचा समावेश होता.

  स्‍टीलकेस बाबत

  १०८ वर्षांपासून स्‍टीलकेस इन्‍क. उद्योगक्षेत्रांमधील जागतिक अग्रणी कंपन्‍यांसाठी उत्तम निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करत आली आहे. आम्‍ही आमच्‍या ब्रॅण्‍ड्सच्‍या समूहामधून ही कटिबद्धता दाखवतो. या समूहामध्‍ये स्‍टीलकेस®, कोलेस®, डिझाइनटेक्‍स®, टर्नस्‍टोन®, स्मिथ सिस्‍टम®, ऑरेंजबॉक्‍स® आणि एएमक्‍यू® यांचा समावेश आहे. सहयोगाने, ते मानवी कटिबद्धतांची पूर्तता करण्‍यासाठी आणि सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय स्थिरतेला पाठिंबा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले आर्किटेक्‍चर, फर्निचर आणि तंत्रज्ञान उत्‍पादने व सेवांचा व्‍यापक पोर्टफोलिओ देतात. आम्‍ही चॅनेल्‍सच्‍या नेटवर्कच्‍या माध्‍यमातून जागतिक स्‍तरावर उपलब्‍ध आहोत. या नेटवर्कमध्‍ये ८०० हून अधिक स्‍टीलकेस डीलर्स आहेत. स्‍टीलकेस ही जागतिक, उद्योग-अग्रणी आणि सार्वजनिक स्‍तरावर व्‍यापार करणारी कंपनी आहे. या कंपनीचा आर्थिक वर्ष २०२० मधील महसूल ३.७ बिलियन डॉलर्स होता. अधिक माहितीसाठी www.steelcase.com येथे भेट द्या.