
या गदारोळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मांडले जाणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेने मंजूर केल्यानंतर तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. कृषी कायदे निरसन विधेयक-2021 लोकसभेत विचारार्थ आणि पास होण्यासाठी सूचीबद्ध केले गेले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. पहिल्या सत्रात लोकसभा आणि राज्यसभेच्या नवीन सदस्यांनी शपथ घेतली. त्यानंतर गेल्या अधिवेशनानंतर निधन झालेल्या खासदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाची सुरुवातच गदारोळाने झाली आणि त्यामुळे लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही.
या गदारोळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक मांडले जाणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेने मंजूर केल्यानंतर तीन कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. कृषी कायदे निरसन विधेयक-2021 लोकसभेत विचारार्थ आणि पास होण्यासाठी सूचीबद्ध केले गेले आहे.
लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आणले जाईल. या विधेयकात तीन कृषी कायदे रद्द करण्याचा प्रयत्न आहे ज्यांच्या विरोधात शेतकरी एक वर्षापासून आंदोलन करत आहेत.