दिवाळीपूर्वी सामान्यांसाठी खुशखबर; बाजारपेठेत काजू-बदामाच्या दरात मोठी घसरण

बदामाचा भाव ११०० रुपयांवरून ६८० रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव ११२० रुपयांवरून ६६० रुपयांवर घसरला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव ११४० रुपयांवरून ६८० रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. अफगाणिस्तानच्या बदामाची किंमत ११९० रुपयांवरून ६०० ते ७०० रुपये किलोवर आली आहे.

    मुंबई: ऐन दिवाळीच्या तोंडावर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देशातील घाऊक बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव १२०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हा दर ६०० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे.

    बदामाचा भाव ११०० रुपयांवरून ६८० रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव ११२० रुपयांवरून ६६० रुपयांवर घसरला आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव ११४० रुपयांवरून ६८०

    रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. अफगाणिस्तानच्या बदामाची किंमत ११९० रुपयांवरून ६०० ते ७०० रुपये किलोवर आली आहे. त्याचबरोबर काजूचा भाव १००० रुपयांवरून ८०० रुपये किलोवर आला आहे. अक्रोडचे दर १००० रुपये किलोवरून ८०० रुपये किलोवर आले आहेत.

    बदामाचे उत्पादन झाल्यानंतर ते बराच काळ ओले असतात आणि त्यात तेलाचे प्रमाण जास्त असते आणि नंतर ते सुकते. जे बदाम सुकवले जातात, त्यातून तेल काढले जाते. हे प्रत्येक बदामाच्या दर्जावर अवलंबून असते. भारतात प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून बदामांची आयात होते. जे दर्जेदार असतात आणि तेलाचे प्रमाण जास्त असल्याने ते खूप महागडे विकले जातात. याशिवाय ममरा कर्नल बदाम इराणमधून येतात.