ही आहेत आहेत तुमच्या बजेटमधली Gadgets, व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट करा तुमच्या पार्टनरला; तो ही होईल भलताच खूश

काहीजण आपल्या पार्टनरला कपडे (Dress), चॉकलेट्स (Chocolates) देऊन त्यांच्या दिवस विशेष साजरा करतात, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशाच गिफ्ट्सविषयी, जे त्यांच्या उपयोगी येतील आणि त्यांना आवडतीलही.

    या वर्षी 14 फेब्रुवारी (14 February) ला Valentines Day साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी लोकं आपल्या पार्टनर(Partner)ला खूश करण्यासाठी त्यांना स्पेशल फील (Special Feel) करता यावं म्हणून अनेक प्रकारचे गिफ्ट्स (Gifts) देतात. पण चांगल्या गिफ्ट्सचा शोध घेणं तेवढी सोपी गोष्ट नक्कीच नाही.

    काहीजण आपल्या पार्टनरला कपडे (Dress), चॉकलेट्स (Chocolates) देऊन त्यांच्या दिवस विशेष साजरा करतात, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही अशाच गिफ्ट्सविषयी, जे त्यांच्या उपयोगी येतील आणि त्यांना आवडतीलही. आम्ही आपल्याला सांगत आहोत असे गॅजेट्स (Gadgets) विषयी, ज्यांची किंमत 4 हजार (4 Thousand) रुपयांहूनही कमी आहे. चला तर जाणून घेऊया.

    Samsung Level U2 Earphone :

    Samsung Level U2 में 12mmचे स्पीकर्स दिले आहेत, सोबतच दोन मायक्रोफोनही दिले आहेत. तर या लेटेस्ट ईयरफोनमध्ये कंपनीने स्केलेबल कोडेक टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. Samsung Level U2 हाइब्रिड केनाल डिझाइन केलं आहे आणि याला IPX2 waterproof rating ही मिळाली आहे. Samsung Level U2 चे ऑडियो डिवाइस SBC, AAC and scalable codec ला सपोर्ट करते. तर पावर बॅकअपसाठी कंपनी का दावा आहे की हेडफोन 18 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देण्यासाठी सक्षम आहे. यात युजर्स 13 तास बोलू शकतो. याशिवाय कंपनीने स्टँडबाय टाइम 500 तासांचा दिला आहे. याची किंमत भारतात अवघी १,९९९ रुपये आहे. हे काळा आणि निळा अशा दोन रंगात उपलब्ध आहेत.

    Lumiford MAX T55 Earphone :

    Lumiford MAX T55 मध्ये शानदार साऊंडसाठी हाय-फाय बास दिला आहे. यात ब्लूटूथ व्हर्जन 5।0 चा सपोर्ट दिला आहे. या इयरफोनची कनेक्टिविटी रेंज 10 मीटरपर्यंत आहे. तर यात 6mm चे डायनामिक ड्रायवर्स दिले आहेत. पावर बॅकअप साठी MAX T55 वायरलेस इयरफोन मध्ये 30mAh ची बॅटरी आहे, जी 3 तासांचे बॅकअप देण्यासाठी सक्षम आहे. याच्या चार्जिंग केस मध्ये 400mAh ची बॅटरी दिली आहे. तर सिंगल चार्ज मध्ये हा इयरफोन 15 तासांचा बॅकअप देतो असा कंपनीचा दावा आहे. या इयरफोन मध्ये टच कंट्रोलची सुविधाही देण्यात आली आहे. याच्या माध्यमातून युजर्स म्युझिक चेंज आणि कॉल घेऊ किंवा कट करू शकतात. याची किंमत 3,599 रुपये आहे आणि हा काळ्या रंगात उपलब्ध आहे.

    Zoook Rocker Thunder Bolt karaoke Speaker :

    Zoook Rocker Thunder Bolt karaoke Speaker LED डायनामिक लाइट दिली आहे पावर बॅकअपसाठी यात 1200mAh ची बॅटरी दिली असून चार्ज होण्यासाठी 3 ते 5 तासांचा अवधी लागतो. हा सिंगल चार्ज मध्ये पाच तासांचा बॅकअप देतो. या स्पीकर मध्ये 6 वूफर दिले आहेत, जे आपल्या पार्टीची शान वाढवतील Thunder Bolt karaoke पार्टी स्पीकर में ब्लूटूथ वर्जन 5।0 दिलं आहे. साऊंडसाठी X-Bass आहे. स्पीकर मध्ये युएसबी पोर्ट आणि Aux ही मिळेल. याशिवाय स्पीकर मध्ये अनेक बटन दिले आहेत. याची किंमत 2,499 रुपये आहे.

    OnePlus Band :

    OnePlus Band मध्ये 1।1 इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात ब्लड ऑक्सिजन सेंसर, थ्री अॅक्सेस एक्सलेरोमीटर आणि जाइरोस्कोप, ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर आहे. यात प्री-लोडिड 13 एक्साइड मोड दिले आहेत, यात आऊटडोअर रन, इनडोअर रन, इलिप्टिकल ट्रेनर, रोइंग मशीन, क्रिकेट, बॅडमिंटन, पूल स्विमिंग, आऊटडोअर सायकलिंग, फॅट बर्न रन, आऊटडोअर रन, इनडोअर सायकलिंग, योगा आणि फ्री ट्रेनिंगचा समावेश आहे. हा बँड स्लीप पॅटर्नही ट्रॅक करतो. हा सहज अँड्रॉइड 6.0 किंवा त्यावर चालणाऱ्या अँड्रॉइड डिव्हाइसेस सोबत पेयर्ड करता येऊ शकतं. OnePlus Band मध्ये 100mAh ची बॅटरी दिली आहे. हा सिंगल चार्ज मध्ये 14 दिवस वापरता येईल. याची किंमत 2,499 रुपये आहे आणि हा काळ्या रंगात उपलब्ध आहे.

    Mivi Roam 2 bluetooth speaker :

    Mivi Roam 2 ब्लूटूथ स्पीकर मध्ये 2000mAh ची बॅटरी आहे, जी सिंगल चार्ज मध्ये 24 तास चालते. तर यात 5 वॉटचे स्पीकर्स आहेत. सोबतच स्पीकर मध्ये एचडी Stereo साऊंड आणि पावरफुल बास दिला आहे. यात ब्लूटूथ 5।0 आहे, याची कनेक्टिविटी रेंज 10m आहे. या स्पीकर ला IPX 67 ची रेटिंग मिळाली आहे. हा स्पीकर वाटरप्रूफ आहे. असं मानलं जातंय की Mivi Roam 2 ब्लूटूथ स्पीकरची Lumiford स्पीकरशी तगडी स्पर्धा पहायला मिळेल. याची किंमत 1,199 रुपये आहे.