काय सांगता! हा तुमचा भ्रम आहे भ्रम; ज्यांना आपण समजतो आहोत पेंग्विन ते आहेत Aliens?, मिळालेत अन्य ग्रहाशी कनेक्शनचे पुरावे; जाणून घ्या नेमकं प्रकरण

पेंग्विनबाबत एक विचित्र दावा करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीवरील बर्फाळ परिसरात दिसून येणारे काळे-पांढरे पेंग्विन हे एलियन्स असू शकतात. अशी माहिती लोकमत.कॉमने दिली आहे.

    लंडन : ध्रुवीय प्रदेशात (Polar region) वास्तव्य असलेला पेंग्विन (Penguin) हा या जगातील सर्वात विचित्र प्राण्यांपैकी एक आहे. हा एक असा पक्षी आहे ज्याला लांब उड्डाण करता येत नाही तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हा पक्षी चालण्यालाच पसंती देतो. आता या पेंग्विनबाबत एक विचित्र दावा (claim) करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीवरील बर्फाळ परिसरात दिसून येणारे काळे-पांढरे पेंग्विन हे एलियन्स असू शकतात (Experts estimate that the black-and-white penguins that appear in the Earth’s glaciers may be aliens).

    तज्ज्ञांना पेंग्विनच्या विष्ठेमध्ये एक खास प्रकारचे रसायन मिळाले आहे. ते शुक्र ग्रहावरसुद्धा सापडते. ब्रिटनमधील संशोधकानी पेंग्विनच्या विष्ठेमध्ये phosphine नावाचे रसायन शोधले आहे. या शोधामुळे पेंग्विनच्या उत्पत्तीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता शुक्र ग्रहापासून ३८ दशलक्ष मैल दूर असलेल्या पृथ्वीवर फॉस्फिन कसे काय अस्तित्वात असू शकते, याचा शोध तज्ज्ञांकडून घेण्यात येत आहे.

    संशोधनानंतर आता तज्ज्ञांना अपेक्षा आहे की, पेंग्विन दुसऱ्या जगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या जिवांची म्हणजेच एलियन्सची ओळख पटवण्यामध्ये त्यांची ओळख पटवू शकतो. या रसायनाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ आता Gentoo Penguins च्या जीवनशैलीची ओळख पटवण्यासाठी अधिक संशोधनाची योजना आखत आहेत. हे पेंग्विन फॉकलँड बेटावर मोठ्या प्रमाणात आहेत. रिपोर्ट्सनुसार जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या लाँचपूर्वी पेंग्विन आणि फॉस्फिनबाबत शोध घेतला जात आहे.

    डेलिस्टारशी बोलताना लंडनमधील इंपिरियल कॉलेजचे डॉ. डेव्ह क्लेमेंट्स यांनी सांगितले की, फॉस्फिनचा शोध हा खरा आहे. मात्र हे कसे तयार होते हे आम्हाला माहिती नाही. Anaerobic Bacteria फॉस्फिन तयार करतात. ते तलावातील चिखल आणि पेंग्विनच्या विष्ठेमध्ये सापडतात. २०२० मध्ये शुक्र ग्रहाच्या आसपास गॅसच्या आवरणांमध्ये या रसायनाच्या खाणाखुणा सापडल्या होत्या. तेथील वातावरण पृथ्वीशी मिळतेजुळते आहे.