What thoughts are going on in the head telling the helmet; Will do mind reading

अमेरिकेतील कर्नेल कंपनीचे संस्थापक ब्रायन जॉनसन असे हेल्मेट तयार करत आहे, जे मानवी मेंदूत काय चालले आहे हे सांगू शकेल. ते अशी यंत्रणा तयार करत आहे, जी मानवी मेंदूला एका आर्टिफिशिअल इंटेलिजेनशी कनेक्ट करू शकते. या माइंड रिंडिंग हेल्मेट असे म्हटले आहे. हे खास हेल्मेट माणसाच्या मेंदूतील कार्याबाबत माहिती देईल. रिपोर्टनुसार जॉनसन यांनी फ्लो आणि फ्लक्स अशा दोन हेल्मेटवर प्रयोग केला.

    महिलांच्या डोक्यात नेमके काय चालले आहे कुणीच सांगू शकत नाही, असे मिश्किलपणे म्हटले जाते. पण खरंतर फक्त महिलाच नाही तर कोणत्याच माणसाच्या डोक्यात काय चालले आहे, हे फक्त पाहून कुणीच सांगू शकत नाही. पण आता हे शक्य होणार आहे. मानवी डोक्यात नेमके काय चालले आहे हे समजणार आहे. यासाठी एक खास हेल्मेट (माईंड रिडींग हेल्मेट) तयार होत आहे.

    अमेरिकेतील कर्नेल कंपनीचे संस्थापक ब्रायन जॉनसन असे हेल्मेट तयार करत आहे, जे मानवी मेंदूत काय चालले आहे हे सांगू शकेल. ते अशी यंत्रणा तयार करत आहे, जी मानवी मेंदूला एका आर्टिफिशिअल इंटेलिजेनशी कनेक्ट करू शकते. या माइंड रिंडिंग हेल्मेट असे म्हटले आहे. हे खास हेल्मेट माणसाच्या मेंदूतील कार्याबाबत माहिती देईल. रिपोर्टनुसार जॉनसन यांनी फ्लो आणि फ्लक्स अशा दोन हेल्मेटवर प्रयोग केला.

    फ्लो हेल्मेट मेंदूतील रक्तातील ऑक्सिजिनिकरण तपासण्यासाठी लेझर लाइटचा वापर करते, तर फ्लक्स न्यूरॉन्स फायरिंगच्या इलेक्ट्रिकल इम्प्ल्स रेकॉर्ड करते. हे हेल्मेट मानवी मेंदूत काय चालले आहे, याचा योग्य फोटो दाखवणार आहे. जॉन्सन यांची माइंड रिडिंग स्टार्टअप कंपनी कर्नेलने तयार करण्यात आलेली उपकरणे वैद्यकीय संशोधन मशीन्समध्ये आधीपासूनच आहेत. माइंड रिंडिंग हेल्मेटच्या रिसर्चच्या सुरुवातीला जॉनसन यांनी स्पेस एक्स ते एलन मस्क यांच्याशी चर्चाही केली होती. ज्यांच्या न्यूरालिंक प्रोजेक्टचे उद्दिष्ट मानवी मेंदूत इलेक्ट्रोड इम्प्लांट करणे आहे. 2030 पर्यंत हे सेन्सर हेल्मेट तयार होण्याची आशा त्यांना आहे. याची किंमत 50,000 डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख आहे, असे जॉन्सन यांनी सांगितले.

    हे सुद्धा वाचा