kumarswamy

देवेगौडा एकमात्र असे पंतप्रधान होते की, त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. १५ ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरून जे हिंदीत भाषण दिले होते त्या कानडी भाषेतील भाषणाचा हिंदी अनुवाद त्यांच्याच मंत्रिमंडळातीळ एक मंत्री सी.एम. इब्राहिम यांनी केला होता.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व जद(से) नेते एच.डी . कुमारस्वामी हे पश्चाताप  (Kumaraswamy regrets) करीत आहेत. काँग्रेससोबत (Congress ) आघाडी करून आपण फार मोठी चूक केली व राजकारणात जे मिळविले होते, ते सर्वकाही गमावून बसलो. असा ते पश्‍चाताप करीत आहेत. भाजपासोबत चांगले संबंध ठेवले असते तर आज आपणच कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलो असतो, असे ते म्हणाले. सर्वकाही संपून गेल्यानंतर पश्‍चाताप करून काय उपयोग होणार आहे. राजकारणात ज्याचे गणित बिघडते, ती व्यक्ती कुठलीच राहत नसते. हा राजकारणाचा नियमच आहे. त्यांचे वडील माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडासुद्दा त्यांच्या राजकीय अपयशाबद्दल काँग्रेसलाच दोषी ठरवित आहेत. नशिबानेच आपण देशाचे पंतप्रधान झालो होतो, यावर ते विश्‍वासच ठेवत नाही.

लोकशाहीमध्ये जनताच सर्वश्रेष्ठ असते. जनता एखाद्या नेत्याला खूप वर नेत असते तर कघी त्या नेत्याने जनताविरोधी कामे केली तर त्याला फर्शीवर आदळूनसुद्धा देत असते. नेत्यांचा संधिसाधूपणा जनता ओळखून असते व अशा नेतृत्वाला जनता कुठलेच ठेवत नाही. जी एच.डी. देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार काँग्रेसच्या कुबड्यावर टिकून होते. केंद्रात एच.डी . देवेगौडा यांचा संयुक्‍त आघाडी सरकारला काँग्रेस आणि गैरभाजपा पक्षांचे समर्थन होते. देवेगौडा जरी पंतप्रधान होते तरी सत्तेची सर्व सूत्रे काँग्रेसच्याच हातात होती . कॉँग्रेसने काही दिवसानंतर देवेगौडा यांना हटवून गुजराल यांना पंतप्रधान बनविले होते.

देवेगौडा एकमात्र असे पंतप्रधान होते की, त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. १५ ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरून जे हिंदीत भाषण दिले होते त्या कानडी भाषेतील भाषणाचा हिंदी अनुवाद त्यांच्याच मंत्रिमंडळातीळ एक मंत्री सी.एम. इब्राहिम यांनी केला होता. देवेगौडा यांचे सुपुत्र कुमारस्वामी यांचे कर्नाटकमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने आघाडी सरकार होते. त्यावेळी असे ठरले होते की, अडीच वर्षे कुमारस्वामी मुख्यमंत्री राहतील आणि अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री असेल. परंतु कुमारस्वामींचा अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नव्हते, तेव्हा भाजपाने पाठिंबा काढून घेतला, त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोबत आघाडी करून सरकार स्थापन केले, परंतु काँग्रेसने त्यांना शक्तिहीन मुख्यमंत्री बनवून टाकले. तेव्हा कुमारस्वामींना जाणवले की, आपण भाजपासोबतची आघाडी तोडून मोठी चूक केली. याचे खापर ते त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा यांच्यावर फोडत होते.

इ.स. २०१८ मध्ये काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटाने आपली प्रतिष्ठा नष्ट केली आहे, असा आरोप ते आता करीत आहेत. इ.स. २००६ व २००७ आणि त्यानंतरच्या १२ वर्षात आपण जी राजकीय प्रतिष्ठा मिळविली होती, ती सर्व काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे संपुष्टात आली, असा आरोपही कुमारस्वामींनी केला आहे. काँग्रेससोबत जाणे, ही आपली सर्वात मोठी चूक होती, असेही ते म्हणाले. कुमारस्वामी काहीही म्हणत असले तरी, जेव्हा त्यांनी भाजपासोबतची वचनबद्धता तोडली तेव्हा त्यांची सर्व प्रतिष्ठाच संपुष्टात आली. काँग्रेससोबत त्यांनी केवळ सत्तेसाठी आघाडी केली होती.

सिद्धरामय्यांचे टीकास्त्र

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे की, कुमारस्वामी खोटे बोलण्यात पटाईत आहेत. राजकीय लाभासाठी ते नेहमीच खोटे बोलत असतात. त्यावेळी काँग्रेसचे ८० आमदार होते व जद(से)चे केवळ ३७ आमदार होते, तरीसुद्धा आम्ही कुमारस्वामींना १५ महिनेपर्यंत मुख्यमंत्री बनविले. ते वेस्टंड हॉटेलमधूनच सरकार चालवित होते व सातत्याने असा आरोप करीत होते की, सरकारमध्ये आपले कोणीही ऐकत नाही. खरं तर एच.डी, देवेगौडा यांच्या कुटुंबाची खोटे बोलण्याची संस्कृतीच आहे. ते आनंदातही रडत असतात आणि दुःखातही ! लोकांचा विश्‍वास मिळविण्यासाठी व लोकांना प्रभावित करण्यासाठीही ते रडत असतात. म्हणूनच कुमारस्वामी यांच्या रडण्याला आता कोणीही फारसे मनावर घेत नाही. ॉ

आता भाजपा का म्हणून विचारेल

येदियुरप्पा यांच्या नेतृत्वात कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार आहे. त्यांनी जद(से.) सोबत आघाडी केली होती, परंतु जद(से. ) विश्‍वासपात्र नाही हे भाजपाच्या लक्षात आले. आता कुमारस्वामी कितीही म्हणत असले ‘की, आपण भाजपासोबत चांगले संबंध ठेवले असते तर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले असते, परंतु आता भाजपा मात्र कुमारस्वामीला सहकार्य करणारच नाही.