
WhatsApp ने यापूर्वीही आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे की, अधिक चांगला अनुभव घेण्यासाठी अँड्रॉइड किंवा iOSचे नवीनतम व्हर्जन वापरावे. तुम्ही अजूनही जुने डिव्हाईस वापरत असाल तर आजपासून तुमचा फोन WhatsApp सपोर्ट करेल की, नाही हे तपासावे लागेल.
नवी दिल्ली : WhatsApp जगभरातील जवळपास प्रत्येकजण वापरतो. त्याची जबरदस्त वैशिष्ट्ये वापरकर्त्यांना उत्तम अनुभव देण्यासाठी परिपूर्ण म्हणता येईल. जरी कंपनी सेवा प्रदान करते, परंतु अलीकडेच कंपनीने जाहीर केले आहे की WhatsApp निवडक iOS आणि Android डिव्हाइसेसवर 1 नोव्हेंबरपासून म्हणजे आजपासून काम करणे बंद करेल.
WhatsApp ने यापूर्वीही आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे की, अधिक चांगला अनुभव घेण्यासाठी अँड्रॉइड किंवा iOSचे नवीनतम व्हर्जन वापरावे. तुम्ही अजूनही जुने डिव्हाईस वापरत असाल तर आजपासून तुमचा फोन WhatsApp सपोर्ट करेल की, नाही हे तपासावे लागेल. तुम्ही हे कसे तपासू शकता ते जाणून घेऊया.
आजपासून WhatsApp या फोनला सपोर्ट करणार नाही :
रिपोर्टनुसार, WhatsApp 4.0.4 किंवा त्याहून जुन्या व्हर्जनच्या Android फोनमध्ये काम करणार नाही. दुसरीकडे, WhatsApp यापुढे iOS 9 किंवा पूर्वीच्या आवृत्त्यांना सपोर्ट करणार नाही. याशिवाय KaiOS 2.5.0 आणि त्यापूर्वी चालणारे फोन देखील यादीत आहेत.
WhatsApp ला तुमचा फोन सपोर्ट करणार की नाही असं करा चेक
Step 1 : तुमच्या फोन सेटिंग्समध्ये जा.
Step 2 : आता, About Phone हा पर्याय निवडा.
Step 3 : येथे तुम्ही पाहू शकाल की, तुमचा फोन कोणत्या सॉफ्टवेअरवर काम करत आहे. जर तुमचा फोन वरीलपैकी सॉफ्टवेअरवर सुरु असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
Step 4 : जर तुमच्या फोनवर लेटेस्ट अपडेट आलं असेल, ते अपडेट करा किंवा लेटेस्ट OS सपोर्टवाला नवीन फोन खरेदी करा. तथापि, त्यापूर्वी तुम्हाला तुमचे चॅट बॅकअप घ्यावे लागेल.
या स्मार्टफोन्सवर बंद होणार WhatsApp
एलजी:
एलजी ऑप्टिमस L5 II, एलजी ऑप्टिमस L3 II, एलजी ल्यूसिड 2, एलजी ऑप्टिमस L7, एलजी ऑप्टिमस L7 II ड्यूल, एलजी ऑप्टिमस L7 II, एलजी ऑप्टिमस F6, एलजी इनेक्ट, एलजी ऑप्टिमस F3, एलजी ऑप्टिमस L4 II, एलजी ऑप्टिमस L5 ड्यूल, एलजी ऑप्टिमस L4 II ड्यूल, एलजी ऑप्टिमस F3Q, एलजी ऑप्टिमस F7, एलजी ऑप्टिमस F5, एलजी ऑप्टिमस L3 II ड्यूल, एलजी ऑप्टिमस F5, एलजी ऑप्टिमस L5, एलजी ऑप्टिमस L2 II आणि एलजी ऑप्टिमस नाइट्रो एचडी आणि 4X एचडी
ॲप्पल :
ॲप्पल आयफोन 6 एस, ॲप्पल आयफोन ६ एस प्ल्स
हुआवे :
Huawei एस्केंड G740, Huawei एस्केंड डी क्वाड एक्सएल, Huawei एस्केंड मेट, Huawei एस्केंड P1 S, Huawei एस्केंड D2 आणि Huawei एस्केंड D1 क्वाड XL
सॅमसंग :
सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, सॅमसंग गॅलेक्सी SII, सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड II, सॅमसंग गॅलेक्सी एस3 मिनी, सॅमसंग गॅलेक्सी कोर, सॅमसंग गॅलेक्सी एक्सकवर 2 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 2
झेडटीई :
झेडटीई ग्रँड एस फ्लेक्स, झेडटीई ग्रँड एक्स क्वाड V987, झेडटीई वी956 आणि झेडटीई ग्रँड मेमो