manoj sinha

जम्मू-काश्मीरमध्ये ९० टक्के कृषी जमीन आहे. जम्मू- 'काशमीरबाहेरचा कोणीही व्यक्‍ती राज्यातील जमीन खरेदी करू शकत नाही. एव्हढेच नव्हे तर राज्यातील केवळ शेतकरीच कृषी जमीन खरेदी करू शकेल.

जम्मू आणि काश्मीर हे आमचे दोन डोळे आहेत. या दोन्ही विभागाच्या विकासांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. दोन्ही प्रदेशाचा समान विकास करण्यात येईल, असे राज्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे. जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकानंतर विधानसभेच्या निवडणुका टाळण्यात येईल, हे विरोधी पक्षांचे म्हणणे चुकीचे आहे, असेही राज्यपाल सिन्हा यांनी म्हटले आहे. विधानसभा परिसीमन आयोगाचे काम पूर्ण झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येतील. खोर्‍्यामधील लोकसंख्येमध्ये बदल करण्यात येईल, असे म्हणणे तथ्यहीन आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ९० टक्के कृषी जमीन आहे. जम्मू-काश्मीरबाहेरचा कोणीही व्यक्‍ती राज्यातील जमीन खरेदी करू शकत नाही. एव्हढेच नव्हे तर राज्यातील केवळ शेतकरीच कृषी जमीन खरेदी करू शकेल. ५ ऑगस्ट २०१९ नंतर राज्यातील जमीन कोणत्याही परराज्यातील व्यक्‍तीने खरेदी केलेली नाही.

राज्यातील विरोधी पक्षाच्या आघाडीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘गुपकार गँग’ असे म्हटले आहे, त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता राज्यपाल सिन्हा म्हणाले की, ते राजकीय नेते असल्यामुळे त्यांना तसे बोलण्याचा अधिकार आहे. नेते आपसात असे वक्‍तव्य करीतच असतात. मी संवैधानिक पदावर असल्यामुळे अशा वक्‍्तव्याशी आपला काहीही संबंध नाही. नायब राज्यपाल सिन्हा यांनी मागील ४ महिन्यात जम्मू-काश्मीरच्या १० जिल्ह्यांचा दौरा केला आहे. काही लोक धर्म आणि जातीच्या नावावर जम्मू आणि काश्मीरमध्ये भेदभाव करू पाहत आहेत, परंतु सरकार त्यांच्या मताशी सहमत नाही.

सरकार दोन्ही विभागांचा समान विकास करू इच्छिते. डीडीसी निवडणुकांमध्ये काश्मीरच्या १४ आणि जम्मूतील १७ जागांवर ५१.५ टक्के मतदान झाले. जम्मू विभागात जास्त मतदान झाले. दक्षिण काश्मीरमधील जिल्ह्यात कमी मतदान झाले. आणि पुलवामामध्ये मतदानावर बहिष्कार असतानाही काश्मीरमध्ये ३२.५ टक्के मतदान झाले. जम्मूमध्ये ६८.५ टक्के मतदान झाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम व अनंतनागमध्ये मात्र कमी मतदान झाले. बारामुला व रोहतकमध्ये २ जागांवर ३४.५ टक्के मतदान झाले. काश्मीर खोऱ्यात मतदानाच्या वेळी फारसा उत्साह नव्हता, एवढ्यानंतरही प्रशासन विश्‍वास व्यक्‍त करीत आहे.