‘वर्क फ्रॉम होम’ ठरतेय डोके दुखी; रात्रीनंतर ९ नंतर नो वर्क फ्रॉम होमची मागणी 

एकूणच यावर पर्याय काय तर रात्री ९ नंतर 'नो वर्किंग' ची अंमलबजावणी कंपनी व्यवस्थापनाने अत्यंत कठोरपणे राबवली पाहिजे. ज्या कंपन्या वर्क फ्रॉम होमची देत आहेत, त्यांनी ही पद्धती अंगीकारणे आवश्यक आहे. जगभर थैमान घातलेल्या या साथीच्या आजाराचा परिणाम अजूनकाही काळ तरी लोकांवर होत राहणार आहे. पण तोपर्यंत वर्क फ्रॉम होम कामाच्या पद्धतीवर काहीतरी तर्कसंगत तोडगा निघणे आवश्यक आहे.

  कोविड १९चा विषाणू जगभरात पसरला अन माणसाचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेले. कोरोनासारख्या महामारीच्या विषाणूला माणसाच्या आयुष्यात प्रवेश करून लौकिक अर्थाने तसे वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात शाळा, महाविद्यालये बंद राहिली,अद्यापही ती बंदच आहेत, खाद्यपदार्थांचा पुरवठा करणारी छोटी-मोठे उद्योगधंदे अजूनही सावरलेले नाही, प्रचंड तणावाखाली कार्यरत असलेले दिसतात.

  कोरोनाचा विषाणू वाढत असताना अनेक कार्यालयांनी, कंपन्यांनी आपलया कामगारांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधेचा अवलंब करण्यास सुरूवात केली. सुरुवातीला या पद्धतीने दैनंदिनी नियमावली तयार होईपर्यंत त्रासदायक वाटत असलेली पद्धती हळूहळू कर्मचाऱ्यांमध्ये सरावली गेली. कंपनी व्यवस्थापनासाठीही सुरुवातीला फारशी महत्त्वाची न वाटणाही ‘वर्क फ्रॉम होम’ ची पद्धत पुढे चांगली वाटू लागली. त्याचा व्यवस्थापनालाही व्यवहारिकदृष्ट्या फायदा होऊ लागला. मात्र या ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रामुख्याने मानसिक, शारिरीकसारख्या अनके समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे, याचा विचार फारसा होताना दिसून येत नाही.

  वर्क फ्रॉम होमची सुविधा सुरू झाली आणि प्रवासात जाणारा वेळेचे कालावधी कामाच्या तासांमध्ये गणला जाऊ लागला. यातून कामाचे तास वाढवण्यास कंपन्यांनी सुरुवात केली.पूर्वी कंपन्यांच्या कामाचे आठ तास होते त्यात वाढ करून ते अकरा तास करण्यात आले. म्हणजे अधिकचे तीन तास वाढवण्यात आले, किंबहुना त्याहून अधिकही. विशेषत: या कंपन्यांमध्ये जिथे ग्राहक अमेरिकन बेस आहेत. अमेरिकन कंपनीसाठी ,क्लाईंटसाठीच्या या वेळा योग्य आहेत. मात्र भारतातील कर्मचाऱ्यांचे काय? त्यांच्या आरोग्याचे काय?. अमेरिकन कर्मचारी त्यांच्या वर्किंग अवर्समध्ये ते बरोबर काम करतात, परंतु भारतातील कर्मचाऱ्यांच्या वेळेचे काय असा प्रश्न निर्माण होतो. बर्याचदा कामाच्या वेळा उशिरापर्यंत सुरू राहिल्यामुळे हेल्दी आरोग्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी झोप त्यांना मिळतच नसल्याचे दिसून येत आहे. यातून चहा , कॉफीच्या सेवनाचे प्रमाण वाढले. काही ठिकाणी तर त्याचे व्यसन निर्माण झाले, त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसून येऊ लागले.

  अनेक कुटुंबे अशी आहेत जिथे दोघेही आयटी सेक्टरमध्ये कार्यरत असून त्यांना शाळेत जाणारी मुले आहेत. तर काहींना लहान मुले आहेत. कोरोनामुळे शाळाबंद झाल्या,पण बऱ्याच शाळांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले. त्यामुळे पालकांच्या मदतीने , मार्गदर्शनाखाली मुले ऑनलाईन क्लासेसला हजेरी लावू लागली. दुसरीकडे घरात स्वयंपाक बनवणे नित्याचे होवू लागले, अनेकजण घरकामसाठी , स्वयंपाकासाठी कुक लावण्या इतपत आर्थिकदृष्या सक्षम आहेत , पण लॉकडाऊनमुळे कामगार मिळणे दुरापास्त झाले. काही कामगार ठिकाणी मिळाले,पण सोसायटीत बाहेर व्यक्तीला कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट दिल्याशिवाय आता येण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे स्वतः जेवण बनवण्याशिवाय पर्यायच उरला नाही. दुसरं म्हणजे घरात लहान बाळ असलेलया कर्मचाऱ्यांची आणखीणच अडचण झाली. लहान बाळांना सांभाळणाऱ्या बेबीसिटर, आया वा डेकेअर कुठून आणायचे? असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. कोरोना यायाच्या आधी ढीगभर सुविधा उपलब्ध होत्या. अशा दुहेरी स्थित काम करणाऱ्या कर्मचारी मातांसाठी कामच्या तासांमध्ये नियमितता असणे अत्यंत आवश्यक वाटू लागले.

  वर्क फ्रॉम होम सर्वात दुःखद बनले ते नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांसाठी. या जोडप्यांमध्ये एक पार्टनर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील म्हणजेच आयटीमधील तर दुसरा पार्टनर हाऊसवाईफ किंवा हाऊस हसबँड . एक कामात पूर्णपणे गुंतलेला तर दुसरा पूर्णपणे रिकामा. दोघी घरात मात्र एकमेकांना वेळच देऊ शकत नव्हते. यामुळे नवीन लग्नांनंतर आकर्षण सलेल्या वैवाहिक जीवनाचे तीनतेरा वाजून गेल्याचे दिसून येत आहे.

  एकूणच यावर पर्याय काय तर रात्री ९ नंतर ‘नो वर्किंग’ ची अंमलबजावणी कंपनी व्यवस्थापनाने अत्यंत कठोरपणे राबवली पाहिजे. ज्या कंपन्या वर्क फ्रॉम होमची देत आहेत, त्यांनी ही पद्धती अंगीकारणे आवश्यक आहे. जगभर थैमान घातलेल्या या साथीच्या आजाराचा परिणाम अजूनकाही काळ तरी लोकांवर होत राहणार आहे. पण तोपर्यंत वर्क फ्रॉम होम कामाच्या पद्धतीवर काहीतरी तर्कसंगत तोडगा निघणे आवश्यक आहे.