१९८३ सालचा वर्ल्डकप जिंकवणारे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा काळाच्या पडद्याआड

यशपाल शर्मा यांनी भारताकडून ३७ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामने खेळलेल्या शर्मा यांनी टेस्टमध्ये दोन शतकांचा मदतीने १६०६ रन्स बनवले होते. तर वन-डे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ८९ रन्स आहेत. पण या सगळ्यात १९८३ च्या विश्वचषकाच्या काळात त्यांनी खेळलेले काही सामने आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या अप्रतिम फलंदाजी मुळेच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला होता.

    माजी भारतीय क्रिकेटर आणि १९८३ क्रिकेट विश्वचषकाच्या विजयात मोलाची कामगिरी असणाऱ्या यशपाल शर्मा यांचं मंगळवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

    यशपाल शर्मा यांनी भारताकडून ३७ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामने खेळलेल्या शर्मा यांनी टेस्टमध्ये दोन शतकांचा मदतीने १६०६ रन्स बनवले होते. तर वन-डे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ८९ रन्स आहेत. पण या सगळ्यात १९८३ च्या विश्वचषकाच्या काळात त्यांनी खेळलेले काही सामने आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या अप्रतिम फलंदाजी मुळेच भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला होता.

    मात्र १९८३ च्या वर्ल्डकप नंतर यशपाल शर्मा यांच्या करिअरचा चढता आलेख पाहायला मिळत नाही. खराब परफॉर्मन्समुळे यशपाल शर्मा यांना टेस्ट टीम मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. शिवाय वनडेमध्ये देखील त्यांचा समावेश केला गेला नाही.

    यशपाल १९७९ ते १९८३ दरम्यान भारताच्या मध्यम फाळणीचा एक महत्त्वाचा हिस्सा होते. त्यांनी काही वर्ष राष्ट्रीय निवड करता म्हणूनही काम केले आणि २००८ मध्ये पुन्हा पॅनेलवर त्यांची नेमणूक करण्यात आली.

    अशा या क्रिकेटपटुचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.