टोक्यो ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राची आठ रत्न सज्ज

  सध्या क्रीडाविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे ती टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांची. 23 जुलै ते आठ ऑगस्ट दरम्यान चालणारे या स्पर्धांसाठी महाराष्ट्राचे आठ खेळाडू सज्ज झाले आहेत. या स्पर्धेसाठी भारताकडून 126 खेळाडू पाठवले जाणार आहेत. 18 विविध खेळांमध्ये हे 126 भारतीय खेळाडू सहभागी होणार असून 17 जुलैला हे सर्वजण टोक्योसाठी रवाना होणार आहेत.

  या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कोल्हापूर ची टीम खेळाडू तर सातारा बीड सोलापूरचे प्रत्येकी एक खेळाडू समाविष्ट होणार आहे.

  कोण आहेत हे खेळाडू?

  राही जीवन सरनोबत, कोल्हापूर(खेळ-शुटींग-25 मीटर पिस्तूल)

  तेजस्वीनी सावंत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-50 मीटर)

  अविनाश मुकुंद साबळ, बीड (खेळ-अॅथलेटिक्स 3000 मीटर स्टिपलचेस)

  प्रविण रमेश जाधव, सातारा (खेळ-आर्चरी)

  चिराग चंद्रशेखर शेट्टी, मुंबई (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी)

  विष्णू सरवानन, मुंबई (खेळ-सेलिंग)

  स्वरुप महावीर उन्हाळकर, कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल)

  सुयश नारायण जाधव, सोलापूर, (खेळ-पॅरा स्विमर-50 मीटर बटर फ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले)

  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवशी बोलताना मोदीजींनी चक्क “प्रवीणजी नमस्ते, काय कसं काय?” असं मराठीत विचारत त्याची विचारपूस केली.