टीम इंडियातील ८ खेळाडूंना ‘या’ कारणासाठी दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण ( abdominal strain) झाल्यामुळे त्यानं माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या कसोटीत बुमराह काही काळासाठी पेव्हेलियनमध्ये प्राथमिक उपचारासाठी गेला होता. तिसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजीलाही आला नाही आणि फलंदाजीलाही नाही

सिडनी कसोटीतून आतापर्यंत एकूण ८ भारतीय खेळाडूंनी सामन्यातून माघार घेतली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आणि तिसऱ्या कसोटीतील नायक हनुमा विहारी ( Hanuma Vihari) यांच्यापाठोपाठ प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यानेही चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे.

जसप्रीत बुमराहच्या ओटीपोटात ताण ( abdominal strain) झाल्यामुळे त्यानं माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या कसोटीत बुमराह काही काळासाठी पेव्हेलियनमध्ये प्राथमिक उपचारासाठी गेला होता. तिसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजीलाही आला नाही आणि फलंदाजीलाही नाही. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला असून त्याला ४-५ आठवड्यांची विश्रांती सांगितली आहे.

तिसऱ्या कसोटीत हनुमा विहारीच्याही डाव्या पायाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. तरीही वेदनेसह तो मैदानावर शड्डू ठोकून बसला… त्यानं आर अश्विनसह २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला.

पेव्हेलियनमध्ये परत जात असताना विहारीला होत असलेल्या वेदना सर्वांना जाणवल्या असतील. त्याचेही चौथ्या कसोटीत खेळणे अवघड आहे. १५ जानेवारीपासून चौथी कसोटी ब्रिस्बेन येथे सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. प्रत्यक्ष दौऱ्यावर मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल यांच्यानंतर आता रवींद्र जडेजा व हनुमा विहारी ही अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे.