WTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका

या सामन्यांत न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. WTC Final आधी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हा निर्णय बोल्टने घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

    साऊदम्पटन : वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final 2021) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊदम्पटनमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडसोबत सराव म्हणून कसोटी सामने खेळणार आहे.

    या सामन्यांत न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. WTC Final आधी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी हा निर्णय बोल्टने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    ट्रेन्ट बोल्ट खेळणार नसल्याचा मोठा तोटा न्यूझीलंडच्या संघाला होऊ शकतो. कारण आतापर्यंतच्या सामन्यात इंग्लंड विरोधात बोल्टची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे त्याचे संघात नसणे इंग्लंडला फायदेशीर ठरु शकते. तर न्यूझीलंडला मात्र याचा मोठा तोटा होऊ शकतो. न्‍यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्‍टीड यांनी ही माहिती दिली.