भारतीय संघासाठी आजचा सामना ठरणार मोठी सुवर्णसंधी, जिंकल्यावर टी-२० मालिकेवर करणार कब्जा

पहिली मालिका जिंकल्यानंतर आज दुसरा सामना दोन्ही संघामध्ये होणार आहे. परंतु आजचा सामना हा भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आणि एक सुवर्णसंधी म्हणता येईल. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिका खिशात घालणार हे निश्चित. परंतु आजचा सामना भारतीय संघ जिंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिकेला (T-20 Series) सुरूवात झाली आहे. टी-२० मालिकेला सुरूवात होताच भारतीय संघाने कांगारूला पहिलाच दणका दिला आहे. पहिली मालिका जिंकल्यानंतर आज दुसरा सामना दोन्ही संघामध्ये होणार आहे. परंतु आजचा सामना हा भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आणि एक सुवर्णसंधी म्हणता येईल. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिका खिशात घालणार हे निश्चित. परंतु आजचा सामना भारतीय संघ जिंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतीय वेळेनुसार, या सामन्याची सुरूवात दुपारी १.४० वाजता सुरू होईल. भारताची आताची स्थिती पाहिली असता १-० अशी मात भारताने ऑस्ट्रेलियावर केली आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेत १-१ अशी लढत कायम राहिली आहे. परंतु आज भारतीय संघ मागील दोन वर्षांमधील स्थितीचा कायापालट करण्याचा प्रयत्न करणार आहे.

जाडेजाची कमी भासणार

पहिल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाचा ऑलराउंडर खेळाडू (Ravindra Jadeja) बॅटिंगदरम्यान हेल्मेटला लागलेला चेंडू आणि उजव्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे रवींद्र जाडेजा मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे जाडेजाच्या बदल्यात युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. जाडेजाने २३ बॉलमध्ये ४४ धावा केल्या होत्या. तसेच तो खेळात नाबाद ठरला. भारतीय संघामध्ये पाच फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. परंतु आजच्या सामन्यात भारतीय संघ विलक्षण कामगिरी करणार का? हे पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी मह्त्त्वाचं ठरणार आहे.