श्रीलंका संघाकडून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य, भारतीय फलंदाजावर मोठी जबाबदारी

भारताकडून दोन्ही पांड्या बंधूनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवला. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना वन-डे डेब्यू केला. तर श्रीलंका संघातून भानुका राजपक्षाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

    कोलंबो : भारत (Indian Cricket Team) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघाने दिलासादायक फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

    भारतीय गोलंदाजीचा विचार करता तब्बल दोन वर्षानंतर एकत्र आलेल्या ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल जोडीने महत्त्वाचे दोन-दोन विकेट घेतले. सामन्यात उपकर्णधार भुवनेश्वरनेमात्र निराशाजनक कामगिरी केली. त्याला एकही विकेट मिळवता आला नाही. उलट त्याच्या 9 ओव्हरमध्ये त्याला तब्बल 63 रन पडले.

    भारताकडून दोन्ही पांड्या बंधूनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवला. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना वन-डे डेब्यू केला. तर श्रीलंका संघातून भानुका राजपक्षाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

    सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकल श्रीलंका संघाने फलंदाजी घेतली. सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील कर्णधार शनाकाने 39 धावा लगावल्या. तर 9 व्या विकेटसाठी चमिका करुणारत्ने (नाबाद 43) आणि दुश्मंता चमीरा (13) यांनी 40 धावांची भागीदारी करत संघाला एक आव्हानात्मक लक्ष्य मिळवून दिलं.