चौथ्या दिवसाची दिमाखदार सुरुवात ; पुरुष एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत अचंता शरत तिसऱ्या  फेरीत

अचंता शरतने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुरुष एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये तिसरी फेरी गाठण्याचा पराक्रम केला

    टोकियो ऑलिंपिकचा आजचा चौथा दिवस आहे. सकाळी भारताच्या अचंता शरतने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुरुष एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये तिसरी फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. अत्यंत आक्रमक आणि धोरणात्मक खेळ अचंता शरदने अपोलोनियाला कोणतीही संधी दिली नाही सामन्याचे पारडे दुसऱ्या गेम पर्यंत समसमान होते, त्यानंतर अचंता शरतने आघाडी घेत खेळ सातव्या गेम मध्ये जाऊ दिला नाही. अचंता शरतने टियागो अपोलोनिया याच्यावर ४-२ ने मात केली. पहिल्या गेममध्ये २-११,११-८,११-५, ११ ,९-११ ,११-६ आणि ११-९ गुणसंख्या झाली.