Mumbai Indians च्या दुसऱ्या सामन्यातही हार्दिक पंड्याची अनुपस्थिती?, चाहत्यांकडून प्रश्नांचा भडिमार ; प्रशिक्षक शेन बाँडनं केला मोठा खुलासा…

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडनं (Shane Bond) हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) संघाचा समावेश का केला जात नाहीय यावर मोठा खुलासा केला आहे. तसेच हार्दिकच्या चाहत्यांकडूनही प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. 

    आयपीएल 2021 चं दुसरं सत्र सुरू झालं आहे. तसेच मुंबई इंडियन्सने दोन सामने खळले असूनही एकही सामना जिंकता आला नाही. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडनं (Shane Bond) हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) संघाचा समावेश का केला जात नाहीय यावर मोठा खुलासा केला आहे. तसेच हार्दिकच्या चाहत्यांकडूनही प्रश्नांचा भडिमार केला जात आहे.

    शेन बाँड यांच्या म्हणण्यानुसार हार्दिक पंड्याची आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघातील उपयुक्तता लक्षात घेता संघ अत्यंत काळजीपूर्वक पावलं उचलत आहे. हार्दिक पंड्या सराव शिबिरांमध्ये उपस्थित राहत आहे आणि त्याचं ट्रेनिंग देखील उत्तम सुरू आहे. पण आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी तो फिट राहील याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात त्याची निवड केली जात नाहीय, असं शेन बाँड म्हणाले आहेत.

    रोहित शर्मा प्रमाणेच हार्दिक पंड्या देखील खूप चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग घेत आहे. पंड्या आज देखील ट्रेनिंगसाठी नेट्समध्ये होता. लवकरच तो तुम्हाला खेळताना दिसेल, असं शेन बाँड म्हणाले. मुंबईचा संघ आता गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यासाठी पुढील सामने जिंकणं मुंबईला अतिशय महत्त्वाचं असणार आहे.