bancroft

बॉल टेम्परिंगचा(Ball Tampering) वाद ऑस्ट्रेलियन(Australia) क्रिकेटला टोचत राहिल. बॅनक्रॉफ्टसारख्या बर्‍याच खेळाडूंकडे बरीच माहिती आहे आणि ते उघड करण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत, असे गिलख्रिस्टने सांगितले.

    बॉल टेम्परिंग प्रकरणाबाबत(Ball Tampering Scandal) ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमेरून बॅनक्रॉफ्टने नवीन खुलासा केला. या स्पष्टीकरणानंतर अनेकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

    बेनक्रॉफ्टनं एक मुलाखतीमध्ये म्हटले की, बॉल टेम्परिंग प्रकरणाची माहिती बॉलर्सना होती. मात्र तरीही मला, वॉर्नरला आणि स्मिथला या प्रकरणात शिक्षा झाली. मी या प्रकरणात केलेल्या कृतीला जबाबदार आहे. पण याची माहिती टीमला होती. माझ्या कृतीचा (Ball tampering) फायदा बॉलर्सनाच होणार होता.

    आता याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि माजी क्रिकेटपटू गिलख्रिस्टने(Adam Gilchrist) ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाला सुनावले आहे. बॉल टेम्परिंगचा वाद  ऑस्ट्रेलियन क्रिकेटला टोचत राहिल. बॅनक्रॉफ्टसारख्या बर्‍याच खेळाडूंकडे बरीच माहिती आहे आणि ते उघड करण्यासाठी ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत, असे गिलख्रिस्टने सांगितले.

    ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं देखील या प्रकरणात उडी केली आहे. बॉल टेम्पिरिंग प्रकरणात शिक्षा झालेल्या तीन खेळाडूंपेक्षा जास्त जणांना या प्रकरणाची माहिती होती. मैदानात सँडपेपरचा वापर होणार आहे, हे टीममधील सदस्यांना माहिती होती, असा दावा क्लार्कनं केला आहे.

    खेळाडूंना बॉल टेम्परिंग झाल्याचं समजलं नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मॅच खेळताना माझ्या बॅटमध्ये काही बदल झाला तर मला लक्षात येतं. तसंच बॉलर्सना देखील त्यांनी बॉल पाहिल्यावर त्यामध्ये काय बदल होतो हे लगेच समजतं,’ असं क्लार्कनं म्हटलं आहे.