अखेर टीम इंडियातही कोरोनाचा शिरकाव ‘या’ खेळाडूंसह एका सपोर्ट स्टाफलाही कोरोनाची लागण

रिषभ पंतला १० जुलैला कोरोना झाल्याचे समोर आले. तो २९ जूनला युरो चषक स्पर्धेतील इंग्लंड-जर्मनी दरम्यानचा सामना बघायला गेला होता. पंतसह हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह हेदेखील हा फुटबॉल सामना बघायला गेले होते.

    तब्बल २० दिवसांची सुट्टी संपवून इंग्लंड दौऱयावर दाखल झालेल्या खेळाडूंपैकी यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसह एका सपोर्ट स्टाफलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच संपर्कात आलेला दुसरा यष्टिरक्षक रिद्धीमान साहासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व पर्यायी सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ‘टीम इंडिया’त कोरोनाचा शिरकाव झाल्याने संघाची घडी विस्कळीत झाली असून त्याचा कामगिरीवर परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    भारतीय क्रिकेट संघ आपल्या सपोर्ट स्टाफसह सुट्टी संपवून गुरुवारी डरहॅममध्ये बायो-बबलमध्ये परतले. मात्र त्या ठिकाणी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये रिषभ पंतसह आणखी एक स्टाफला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तसेच थ्रो-डाऊन एक्सपर्ट दयानंद गरानी यांची गुरुवारी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दयानंद गरानी यांच्या संपर्कात आल्याने रिद्धीमान साहासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व पर्यायी सलामीवीर अभिमन्यू इस्वरन यांनाही विलगीकरणात रहावे लागले आहे.

    रिषभ पंतला १० जुलैला कोरोना झाल्याचे समोर आले. तो २९ जूनला युरो चषक स्पर्धेतील इंग्लंड-जर्मनी दरम्यानचा सामना बघायला गेला होता. पंतसह हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह हेदेखील हा फुटबॉल सामना बघायला गेले होते. मात्र रिषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ‘बीसीसीआय’ने त्याकडे दुर्लक्ष करीत खेळाडूंची सुट्टी रद्द केली नाही.