harbhajan singh

चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी गोलंदाज आणि वेगवान फलंदाज हरभजन सिंगही (Harbhajan Singh) आयपीएलच्या १३ व्या सत्रातून बाहेर पडला आहे. हरभजन सिंगने वैयक्तिक कारणे सांगून या सीजनमधून स्वत: ला दूर केले आहे.

नवी दिल्ली : आयपीएल २०२० च्या तेराव्या हंगामाला आता थोडेच दिवस बाकी आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२० (IPL 2020) मधून खेळाडू माघार घेण्याचा प्रकार सुरू आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा (CSK) वेगवान फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा चैन्नई सुपरकिंग्ज संघाला दुसरा धक्का बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी गोलंदाज आणि वेगवान फलंदाज हरभजन सिंगही (Harbhajan Singh) आयपीएलच्या १३ व्या सत्रातून बाहेर पडला आहे. हरभजन सिंगने वैयक्तिक कारणे सांगून या सीजनमधून स्वत: ला दूर केले आहे. युएईला रवाना होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे चेपुक येथे पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर होते. हरभजन सिंग आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा तेथे पोहोचले नाहीत. त्यानंतर जडेजा संघासह युएईला पोहोचला, तर हरभजनसिंग भारतात असताना त्याने वैयक्तिक कारण सांगून यंदा आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लसिथ मलिंगाने सुद्धा आपल्या वैयक्तिक कारणांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. त्यामुळे तो श्रीलंकेत आपल्या कुटुंबासोबतच राहणार आहे. लसिथ मलिंगाने आयपीएल २०२० मधून माघार घेतल्यामुळे मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका बसणार आहे.