दिल्लीला पराभवाचा धक्का, कोहलीनंतर आता अय्यरला बारा लाखांचा भुर्दंड

सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.त्यामुळे अय्यरला आणखी एक झटका मिळाला आहे.

अबूधाबी : आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव झाल्यानंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.त्यामुळे अय्यरला आणखी एक झटका मिळाला आहे.

आयपीएल २०२० मध्ये स्लो ओव्हर रेटशी संबंधित हा दुसरा अपराध आहे. गेल्या आठवड्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध (KXIP) झालेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेट कायम ठेवल्यासाठी दोषी ठरवण्यात आले होते. त्यालाही बारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

आयपीएलच्या नियमावलीनुसार किमान ओव्हर रेट राखण्यासंबंधी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रेयसकडून दंड आकारला जाणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदाच नियम मोडला. आयपीएलच्या आचारसंहिते अंतर्गत त्याच्या संघाने पहिल्यांदाच नियम मोडला. त्यामुळे श्रेयस अय्यरला १२ लाख रुपये दंड भरण्याचे आदेश आहेत.

हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर १५ धावांनी मात केली. सलग दोन वेळा विजयी झालेल्या दिल्लीचा विजयरथ हैदराबादने रोखला. सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्ससमोर १६३ धावसंख्येचे लक्ष ठेवले होते, मात्र दिल्ली कॅपिटल्सने १४७ धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.