आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहली सापडला अडचणीत, भरला इतक्या लाखांचा भुर्दंड, काय आहे प्रकार?

कर्णधाराला वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे दंड आकारला जातो. आयपीएलच्या चालू हंगामात प्रथमच कर्णधाराला स्लो ओव्हर रेटबद्दल ही शिक्षा देण्यात आली आहे. वारंवार ही चूक केल्यानंतर कर्णधारला देखील सामन्यातून निलंबित केले जाते. पंजाबने बेंगलोरचा ९७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

 मुंबई : आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून काल गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब (RCB VS KXIP) यांच्यात सामना रंगला होता. परंतु किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ( RCB) पराभव झाला. या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (VIRAT KOHLI) आणखी अडचणीत सापडला. षटकांची गती कमी राखल्याने विराट कोहलीला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या नियमांनुसार, कर्णधाराला वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे दंड आकारला जातो. आयपीएलच्या चालू हंगामात प्रथमच कर्णधाराला स्लो ओव्हर रेटबद्दल ही शिक्षा देण्यात आली आहे. वारंवार ही चूक केल्यानंतर कर्णधारला देखील सामन्यातून निलंबित केले जाते. पंजाबने बेंगलोरचा ९७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत २०६ धावा केल्या. त्यानंतर २०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरचा संघ १०९ धावांत गडगडला. तसेच कर्णधार विराट कोहलीपासून ते संघातील सर्व स्टार खेळाडू फ्लॉप झाले.