डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकरच्या निवृत्तीनंतर, मुंबई इंडियन्सने केलं खास ट्विट

मागील तीस वर्षे रेसलिंग रिंगमध्ये आपली दहशत गाजवणारा डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकर याने कायमस्वरूपी निवृत्ती स्वीकारली आहे. ९० च्या दशकातील डेडमॅन या नावाने प्रसिद्ध असलेला अंडरटकेर आता ५५

मागील तीस वर्षे रेसलिंग रिंगमध्ये आपली दहशत गाजवणारा डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकर याने कायमस्वरूपी निवृत्ती स्वीकारली आहे. ९० च्या दशकातील डेडमॅन या नावाने प्रसिद्ध असलेला अंडरटकेर आता ५५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे वाढते वय लक्षात घेता, अंडरटेकरेने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अंडरटेकरने स्वत: ट्विट करून चाहत्यांना ही बातमी दिली. डब्ल्यूडब्ल्यूई आणि ९० च्या दशकातील मुलांना, त्याने केलेल्या मनोरंजनासाठी धन्यवाद दिले. त्यानंतर मुंबई इंडियन्सनेदेखील त्याच्यासाठी खास ट्विट करत त्याला #ThankYouTaker म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार अंडरटेकरने दोन वर्षांपूर्वीच निवृत्तीचे संकेत दिले होते. तसेच रोमन रेन्ससोबत झालेल्या फाईटिंगमध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचे वृद्ध शरीर ही दुखापत सहन करू शकणार नाही. असं एका मुलाखतीत त्याने सांगितलं होत. त्यामुळे अंडरटेकरने वयाच्या ५५ व्या वर्षी डब्ल्यूडब्ल्यूई मधून निवृत्ती घेतली आहे.