चेन्नई सुपर किंग्जच्या दुसऱ्या पराभवानंतर प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने सांगितलं असं काही…

सपाटून मार खाणाऱ्य़ा चेन्नई सुपरकिंग्सला आता आयपीएलमधील भविष्याच्या लढतींबाबत चिंता लागून राहिली आहे. असे चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (STEPHEN FLEMING) यांनी सांगितले आहे.

आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020) हंगामाला सुरूवात झाली असून १९ सप्टेंबर रोजी सलामीच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI VS CSK) या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. परंतु या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव करून यश मिळवलं होतं. परंतु त्यानंतर चेन्नईने (CSK LOST TWO MATCHES)  दोन सामने खेळले असता, या दोन्ही सामन्यात त्यांचा दारूण पराभव झाला. यादरम्यान, सपाटून मार खाणाऱ्य़ा चेन्नई सुपरकिंग्सला आता आयपीएलमधील भविष्याच्या लढतींबाबत चिंता लागून राहिली आहे. असे चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (STEPHEN FLEMING) यांनी सांगितले आहे.

पहिल्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर पुढील दोन्ही लढतींमध्ये सपाटून मार खाणाऱ्य़ा चेन्नई सुपरकिंग्जला आता आयपीएलमधील भविष्याच्या लढतींबाबत चिंता लागून राहिली आहे. आयपीएल स्पर्धेच्या १२ मोसमांत फिरकी गोलंदाजी ही आमची जमेची बाजू होती, पण या वर्षी त्यामध्येच आम्हाला अपयश येत आहे. रवींद्र जाडेजा (RAVINDRA JADEJA)  व पीयूष चावला 9PIYUSH CHAWLA) यांना सूर अद्याप गवसलेला नाही, असे या संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले.

स्टीफन फ्लेमिंग पुढे म्हणाले की, आम्ही आतापर्यंत तीन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये सामने खेळलो. तिन्ही ठिकाणी भिन्न वातावरण होते. आम्हाला जुळवून घेता आले नाही तसेच गोलंदाजीतही आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. मागील दोन लढतींमध्ये झालेल्या चुका सुधाराव्या लागतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.