आनंदवार्ता! पॅरालिम्पिक्समध्ये अवनी लेखराचा ‘सुवर्णवेध’

अवनीला फायनलमध्ये चीनच्या नेमबाजाने जोरदार फाईट दिली. मात्र गोल्डन ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या अवनीने फायनलमध्ये २४९.६ पॉईंट्स मिळवून सुवर्ण पदक मिळवूनच मैदान सोडले.

    टोकियो: जपानमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक्समध्ये(Tokyo Paralympics) आज दिवसाची सुरुवात अत्यंत आनंददायी झाली असून भारतीय महिला नेमबाज अवनी लेखराने (Avani Lekhara) नेमबाजीत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. अवनी लेखराने १० मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

    भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल (Gold Medal) आहे. अवनी लेखराने १० मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली.

    अवनीला फायनलमध्ये चीनच्या नेमबाजाने जोरदार फाईट दिली. मात्र गोल्डन ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या अवनीने फायनलमध्ये २४९.६ पॉईंट्स मिळवून सुवर्ण पदक मिळवूनच मैदान सोडले. चीनच्या झांगने २४८.९ गुणांसह दुसरं स्थान मिळवत, रौप्य पदक पटकावले.अवनी लेखराने या कामगिरीने पॅरालिम्पिक्समधील नवा रेकॉर्ड निर्माण केला आहे. अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचे प्रतिनिधित्व केले.

    वयाच्या अकराव्या वर्षी अवनी लेखराला रस्ते अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आले. अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे. तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं. त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली.