टी-२० वर्ल्डकपनंतर अनिल कुंबळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता

२०१७ मध्ये कुंबळे यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर विराट कोहलीने २०२१च्या टी २० वर्ल्डकपनंतर आपण भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे असे गुरुवारी जाहीर केले आहे.

    टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री राजीनामा देणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच रवी शास्त्री यांच्यासहित गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा आगामी टी -२० विश्वचषकानंतर कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आता रवी शास्त्री यांनी भारतीय संघ प्रशिक्षकाचा राजीनामा दिल्यानंतर भारताचे माजी गोलंदाज अनिल कुंबळे पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    २०१७ मध्ये कुंबळे यांनी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर विराट कोहलीने २०२१च्या टी २० वर्ल्डकपनंतर आपण भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे असे गुरुवारी जाहीर केले आहे. कुंबळे चार वर्षांपूर्वी मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर कोहलीने रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्याबाबत पाठिंबा दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पॅनलच्या शिफारशींनंतर कुंबळेंना परत आणण्याचे मार्ग शोधले जात असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

    कोहलीने टी-२०चे कर्णधारपद सोडल्याने संघाला नवीन प्रशिक्षकाची गरज आहे अशी बीसीसीआयला खात्री आहे. बीसीसीआय शास्त्रींच्या बदली हेड कोच म्हणून अनिल कुंबळेचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पण याच सोबत वीवीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग यांचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे.