IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात Anti Dopping Test होणार का? ; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती

दुसऱ्या टप्प्यात NADA ला कोरोनाच्या भीतीमुळे कडक बायो बबलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोनाच्या भीतीमुळे IPL 2021 साठी दुसऱ्या टप्प्यात तयार केलेल्या बायो-बबलमध्ये राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (NADA) च्या अधिकाऱ्यांना जाण्याची परवानगी दिली नाही.

    IPL 2021 चे दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. यंदाच्या हंगामात Anti Dopping Test होणार की नाही याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. UAE मध्ये सुरू असलेल्या IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात डोपिंगची चाचणी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. याचं नेमकं काय कारण आहे, तेही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या टप्प्यात NADA ला कोरोनाच्या भीतीमुळे कडक बायो बबलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोनाच्या भीतीमुळे IPL 2021 साठी दुसऱ्या टप्प्यात तयार केलेल्या बायो-बबलमध्ये राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (NADA) च्या अधिकाऱ्यांना जाण्याची परवानगी दिली नाही.

    पहिल्या टप्प्यातील सामन्यांसाठी तीन शहरांमध्ये डोपिंगची चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात नाडाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर डोपिंगच्या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या.