28 वर्षानंतर अर्जेंटिना विजेता; मेस्सीचे स्वप्न झाले साकार

पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात झालेल्या लढतीत अर्जेंटिनाने ब्राझीलला पराभव करत किताबावर नाव कोरले. या विजयामुळे अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीचेही स्वप्न पूर्ण झाले आहे. कर्णधार मेस्सीच्या नेतृत्वात संघाने प्रथमच कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. मेस्सीनं जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नव्हता.

    दिल्ली : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनाने इतिहास रचला आहे. अर्जेंटिनाने ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकाने विजेतेपदावर नाव कोरले. तब्बल 28 वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब अर्जेंटिनाने जिंकला. यापूर्वी 1993 मध्ये अर्जेंटिनाने हा किताब आपल्या नावे केला होता. या विजयासह अर्जेंटिनाने 15 वेळा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

    पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात झालेल्या लढतीत अर्जेंटिनाने ब्राझीलला पराभव करत किताबावर नाव कोरले. या विजयामुळे अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीचेही स्वप्न पूर्ण झाले आहे. कर्णधार मेस्सीच्या नेतृत्वात संघाने प्रथमच कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. मेस्सीनं जिंकलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नव्हता.

    हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्यातील पहिल्या 20 मिनिटांत दोन्ही संघात चांगलीच झुंज बघायला मिळाली. दोन्हीकडून प्रतिकार केला जात असल्याने कुणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचताच आलं नाही. पण, 22 व्या मिनिटाला एंजल डी. मारिया संघाच्या मदतीला धावला. मारियाने पहिला गोल नोंदवत अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाने सामन्यात घेतलेली ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.