…त्याच्यासाठी घराणेशाही हा शब्द अयोग्य, अर्जुन तेंडुलकरच्या ट्रोलर्सची बॉलीवूडमधून विकेट

मुंबई इंडियन्स या संघाने २० लाखाच्या बेस प्राईजवर बोली लावली होती. परंतु अर्जुनला संघात घेण्याचं नेमंक कारण काय? यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. परंतु या प्रश्नावर मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेच्या प्रतिक्रियेनंतर बॉलिवूडमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    मुंबई : आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. १८ फेब्रवारी रोजी आयपीएलचं लिलाव संपन्न झालं. या लिलावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर प्रथमच सहभागी झाला होता. मुंबई इंडियन्स या संघाने २० लाखाच्या बेस प्राईजवर बोली लावली होती. परंतु अर्जुनला संघात घेण्याचं नेमंक कारण काय? यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. परंतु या प्रश्नावर मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेच्या प्रतिक्रियेनंतर बॉलिवूडमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    चित्रपट निर्माता-दिग्दर्शक फरहान अख्तरनं या विषयावर अर्जुनचा बचाव करत त्याच्या टीकाकारांना उत्तर दिलं आहे. फरहाननं ट्विटरवरुन त्याचं या विषयावरचं मत व्यक्त केलं आहे. मला अर्जुन तेंडुलकरबद्दल बोललं पाहिजे. आम्ही अनेकदा एकत्र जिममध्ये असतो. तो त्याच्या फिटनेसवर किती मेहनत घेतो हे मी पाहिलं आहे. एक चांगला क्रिकेटपटू होण्याचं त्याचं ‘लक्ष्य’ आहे. त्याच्यासाठी घराणेशाही हा शब्द अयोग्य आणि क्रूर आहे. त्याची सुरुवात होण्यापूर्वीच त्याच्या उत्साहाची हत्या करु नका. त्याला या पद्धतीनं खाली खेचू नका. असं आवाहन फरहाननं केलं आहे.