पहिल्या सेशनच्या अखेरीस भारताची स्थिती 211 वर 7 बाद

भारताची अवस्था 3 बाद 88 अशी झालेली असताना कर्णधार विराट कोहलीने सावधपणे खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारताने 64.4 ओव्हरमध्ये 146 धावापर्यंत मजल मारली. 

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात (62 धावांची भागीदारी) करुन दिली. मात्र दोघेही काही वेळातच बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा अवघ्या 8 धावांवर बाद झाला.

    भारताची अवस्था 3 बाद 88 अशी झालेली असताना कर्णधार विराट कोहलीने सावधपणे खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारताने 64.4 ओव्हरमध्ये 146 धावापर्यंत मजल मारली.

    आश्विन आणि जाडेजा डाव सावरती असे वाटतानाच टीम साऊदीच्या बॉलवर आश्विनही बाद झाला आहे. सध्या इशांत शर्मा आणि जाडेजा फलंदाजी करत असून दिवसाचे पहिले सेशन संपले आहे. पहिल्या सेशनच्या अखेरीस भारताची स्थिती 211 वर 7 बाद अशी आहे