कांगारूचा टीम इंडियावर दणदणीत विजय, पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने सांगितलं असं काही…

ऑस्ट्रेलियामध्ये दोन्ही संघात एकदिवसीय (ODI) सामना रंगला होता. यामध्ये पहिल्याच मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने उत्कृष्ट कामगिरी करत ६६ धावांनी टीम इंडियाला पराभूत (LOST) केलं आहे. त्यामुळे मालिका (Series) १-० अशी झाली आहे. त्यानंतर कोहलीने (Virat Kohli) खेळांडूंबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सिडनी : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. काल ऑस्ट्रेलियामध्ये दोन्ही संघात एकदिवसीय (ODI) सामना रंगला होता. यामध्ये पहिल्याच मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने उत्कृष्ट कामगिरी करत ६६ धावांनी टीम इंडियाला पराभूत (LOST) केलं आहे. त्यामुळे मालिका (Series) १-० अशी झाली आहे.
त्यानंतर कोहलीने (Virat Kohli) खेळांडूंबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

प्रत्येक खेळाडूला ५० ओव्हरमध्ये चांगली कामगिरी पार पाडणे महत्त्वाचे असते. त्यामुळे समोरच्या संघावर त्याचा प्रचंड प्रभाव पडतो. परंतु आम्ही इतक्या एकदिवसीय मालिका खेळलो आहोत की, ज्यामुळे आम्हाला खेळाचा शेवट कसा करायचा हे माहितये. २५ ओव्हरनंतर खेळांडूची धर-पकड होऊ लागली. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती.

हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी फिट नाही

टीम इंडियाचा वेगावान फलंदाज हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी फिट नाहीये. त्यामुळे टीमवर अधिक प्रभाव पडत आहे. हार्दिक सारखा खेळाडू गोलंदाजीसाठी फिट नाहीये. ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे. आमच्या टीममध्ये कोणताही खेळाडू ऑलराऊंड नाहीये. हे आम्हाला मान्य आहे. असे विराट कोहली म्हणाला.

विकेट न मिळल्यामुळे सामना गमावला

विराटने सांगितले की, सामन्यात समोरच्या खेळाडूची दांडी उडवणे खूप मह्त्त्वाचे आहे. जास्तीत जास्त विकेट न मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला अधिक धावा बनविण्यात यश आलं. त्यामुळे सामना जिंकायचा असेल तर विकेट घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच सुरूवातीला आमच्याकडून काही चुका झाल्या, त्याचसोबतच आम्ही समोरच्या संघावर दबाव टाकला होता. परंतु आम्ही या गोष्टीचा फायदा घेवू शकलो नाही.