टीम इंडियावर ऑस्ट्रेलियाचं कांगारू पॅटर्न, अवघ्या ३६ धावांत लोटांगण

टीम इंडियाची (India) अवस्था बिकट होण्याच्या मार्गाने दिसत आहे. आजच्या तिसऱ्या दिवसाची सुरूवात टीम इंडियाने ९/१ अशी केली. मात्र, टीम इंडियाची अर्धी टीम अवघ्या काही धावांवर माघारी परतली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पहिला कसोटी (1st Test Match Day 3 ) सामना सूरू झाला असून आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. परंतु टीम इंडियाची अवस्था बिकट होण्याच्या मार्गाने दिसत आहे. आजच्या तिसऱ्या दिवसाची सुरूवात टीम इंडियाने ९/१ अशी केली. मात्र, टीम इंडियाची अर्धी टीम अवघ्या काही धावांवर माघारी परतली.

सर्वप्रथम जसप्रीत बुमराह दोन धावा काढून आऊट झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा शून्यावर तर मयंक अग्रवाल नऊ धावांवर माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणे शून्यावर आऊट झाला. कर्णधार विराट कोहलीने एक चौकार मारत स्कोअर थोडा वाढवला आणि चार धावा करुन माघारी परतला.

टीम इंडिया अवघ्या ३६ धावांवर ऑल आऊट झाली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी अवघ्या ९० धावांचं आव्हान आहे. त्यामुळे टीम इंडियावर ऑस्ट्रेलियाने कांगारू पॅटर्न वापरल्याचे दिसत आहे.