ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू भारतासाठी ठरू शकतो घातक, रिकी पॉन्टिंगने केला मोठा खुलासा…

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्याच दिवशी चांगली कामगिरी केली आणि १९१ धावांपर्यंत ऑस्ट्रेलियाने मजल मारली. यामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)  ४ गडी बाद केले. परंतु नाथन लॉयन (Nathan Lyon) सुद्धा भारतीय संघासाठी एक आव्हान आणि घातक खेळाडू ठरू शकतो. असं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉइंटिंगने म्हटले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यात पहिली कसोटी (1st Test Match) मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्याच दिवशी चांगली कामगिरी केली आणि १९१ धावांपर्यंत ऑस्ट्रेलियाने मजल मारली. यामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)  ४ गडी बाद केले. परंतु नाथन लॉयन (Nathan Lyon) सुद्धा भारतीय संघासाठी एक आव्हान आणि घातक खेळाडू ठरू शकतो. असं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने म्हटले आहे.

नाथन लॉय भारतासाठी एक मोठं आव्हानं आणि घातक खेळाडू ठरू शकतो. कारण लॉयन सुद्धा अश्विन सारखा फिरकीपटू आहे. अँडलिड ओव्हल मैदानावर पिंक बॉलने सुरू असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यासाठी पहिल्या सामन्यात त्याने एक विकेट घेतला होता. त्याचप्रमाणे पेसर मिशेल स्टार्कने सर्वाधिक गडी बाद करून चार विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. असे रिकी पॉन्टिंगने म्हटले आहे.