१ जुलैपासून बॅडमिंटन सरावाला प्रारंभ

हैदराबाद येथे १ जुलैपासून बॅडमिंटन सरावाला प्रारंभ होणार आहे. तेलंगणा सरकारने भारतीय बॅडमिंटन संघटनेला परवानगी दिली आहे. मात्र बॅंडमिंटन स्पर्धेला देशांतर्गत पगवानगी नाकारण्यात आली आहे. भारतीय

 हैदराबाद येथे १ जुलैपासून बॅडमिंटन सरावाला प्रारंभ होणार आहे. तेलंगणा सरकारने भारतीय बॅडमिंटन संघटनेला परवानगी दिली आहे. मात्र बॅंडमिंटन स्पर्धेला देशांतर्गत पगवानगी नाकारण्यात आली आहे. भारतीय क्रिडा प्राधिकरणाने बेंगळूरू येथे गेल्या महिन्यात सरावाला परवानगी दिल्यामुळे, तेथील बॅडमिंटनचा सराव सुरू झाला होता. मात्र हैदराबाद मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे  कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. त्यामुळे तेलंगणा सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. परंतु त्याचा फटका आता खेळाडूंच्या सरावाला बसला आहे. 

मात्र जर तेलंगणा सरकारने परवानगी दिली तर १ जुलैपासून हैदराबाद येथे सरावाला सुरुवात करू, असे बीएआयचे सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले.  फेब्रुवारीमध्ये वरिष्ठ क्रमवारी स्पर्धेऐवजी १, २ आणि ३ अशा तीन पातळ्यांवरील स्पर्धेचा प्रस्ताव बीएआयकडून मांडण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे सध्या त्याबाबत कोणतीच चर्चा नाही. त्यामुळे भारतात कोरोनामुळे हैदराबाद आणि पुण्यात होणारी इंडिया कनिष्ठ आंतरराष्ट्रीय ग्रां-प्री स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे राज्यांतील कोरोनाची स्थिती पाहता, सप्टेंबपर्यंत देशांतर्गत बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन कठीण आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल,असे सिंघानिया यांनी स्पष्ट केले आहे.