भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून बहादूर सिंग पायउतार

  • २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून बहादूर सिंग पायउतार
  • बहादूर सिंग यांचे भारतीय अॅथलेटिक्ससाठी मोलाचे योगदान लाभले.
  • फेब्रुवारी १९९५ पासून ते भारताचे अॅ्थलेटिक्स प्रशिक्षक होते

२५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून बहादूर सिंग पायउतार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशिक्षक बहादूर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने  २०१० दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत १२ पदके  मिळवली. २०१८च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आठ सुवर्णपदकांसह एकूण २० पदके  जिंकली होती.

परंतु वयोमर्यादेनुसार करारात मुदतवाढ देण्यास भारतीय क्रीडा प्राधिकरणाने नकार दिल्यानंतर बहादूर सिंग हे भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून ७ जुलै रोजी मंगळवारी पायउतार झाले आहेत. बहादूर सिंग यांचे भारतीय अॅथलेटिक्ससाठी मोलाचे योगदान लाभले.

फेब्रुवारी १९९५ पासून ते भारताचे अॅ्थलेटिक्स प्रशिक्षक होते. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सराव शिबिरातील प्रशिक्षकांसाठी वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र त्यांना करारात मुदतवाढ देण्यास भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने नकार दर्शवल्याचं सांगितलं जात आहे.