#Tokyo Olympics 2020 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पैलवान बजरंग पुनियाला कांस्यपदक

ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020)) भारताला आणखी एक पदक मिळालं असून हे सहावं पदक भारताला मिळालं आहे. पुनियाने कझाकस्तानचा पैलवान नियाझबेकोव्हवर ८-० ने मात केली आहे. पुनियाने (Bajrang Punia) भारताला कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर हरियाणात कुटुंबियांचा  जल्लोष सुरू आहे. 

    टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) पैलवान बजरंग पुनियाला (Bajrang Punia) कांस्यपदक (Bronze Medal) मिळालं आहे. कझाकस्तानच्या पैलवानवर बजरंग पुनियाने मात केली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळालं असून हे सहावं पदक भारताला मिळालं आहे. पुनियाने कझाकस्तानचा पैलवान नियाझबेकोव्हवर ८-० ने मात केली आहे. पुनियाने भारताला कांस्यपदक मिळवून दिल्यानंतर हरियाणात कुटुंबियांचा  जल्लोष सुरू आहे.

    भारताचा पैलवान बजरंग पुनियाची आजची लढत कांस्यपदकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. कझाकिस्तानचा पैलवान डॉलेट नियाझबेकोव्हवर त्याने मात केली आहे. तसेच पुनियाने सावध खेळी करत ८-० ने कझाकस्तानच्या पैलवानावर मात केली आहे.