बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय , पंजाबने केले तीन संघात बदल

बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे पंजाबवर दडपण असणार आहे. पंजाबला सहा पैकी दोन सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. हा सामना जिंकून बंगळुरुला पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची संधी आहे. तर स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी पंजाबला हा सामना जिंकणं महत्वाचं आहे.

    बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबने संघात तीन बदल केले आहेत. रिले मेरेदिथ, प्रभसिमरन सिंग आणि हरप्रीत ब्रार यांना संघात स्थान दिलं आहे. तर मोजेस हेन्रिक, अर्शदीप सिंग आणि मयंक अग्रवाल यांना आराम देण्यात आला आहे. मयंकची प्रकृती ठिक नसल्याचं कारण देण्यात आलं आहे.

    बंगळुरुने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे पंजाबवर दडपण असणार आहे. पंजाबला सहा पैकी दोन सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. हा सामना जिंकून बंगळुरुला पुन्हा गुणतालिकेत अव्वल स्थानी जाण्याची संधी आहे. तर स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी पंजाबला हा सामना जिंकणं महत्वाचं आहे.

    आयपीएल गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बंगळुरुने सहा सामन्यांपैकी पाच विजयांसह १० गुण मिळवले आहेत, तर पंजाब दोन विजय आणि चार पराभवांमुळे सहाव्या क्रमांकावर आहे.