पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ‘या’ अष्टपैलूकडे सोपवली नेतृत्वाची धुरा

गेल्या काही काळापासून बांगलादेशचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. महमदुल्लाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या संघाचा समावेश पहिल्या फेरीसाठी ब गटात करण्यात आलेला आहे. या गटात बांगलादेशचा संघ स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्याशी भिडणार आहे. 

    पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला आहे. अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व महमदुल्लाह या्च्याकडे सोपवण्यात आले आहे. टी-२० विश्वचषकमध्ये अनुभवी शाकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, मुस्तफिझूर रहमान यांचा या संघात समावेश आहे.

    गेल्या काही काळापासून बांगलादेशचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. महमदुल्लाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या संघाचा समावेश पहिल्या फेरीसाठी ब गटात करण्यात आलेला आहे. या गटात बांगलादेशचा संघ स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्याशी भिडणार आहे.

    या स्पर्धेसाठी निवडलेला बांगलादेशचा संघ पुढीलप्रमाणे

    महमदुल्ला (कर्णधार), नईम शेख, सौम्या सरकार, लिट्टन कुमार दास, शकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, अफिफ हुसेन, नुरुल हसन सोहन, शाक मेहेदी हसन, नसुम अहमद, मुस्तफिझूर रहमान, शोरिफूल इस्लाम, तस्किन अहमद, सैफ उद्दीन, शमिम हुसेन, राखीव खेळाडू – रुबेल हुसेन आणि अमिनूल इस्लाम बिपलब