बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर, वर्षभरात खेळवले जाणार ‘इतके’ सामने

बीसीसीआयने आज या नव्या क्रिकेट वर्षाची घोषणा केली. या क्रिकेट वर्षाला ऑक्टोबर २०२१ पासून सीनियर महिला वन डे लीग आणि सीनियर महिला वन डे चॅलेंजर्स ट्रॉफीनं सुरुवात होणार आहे.

    मुंबई : बीसीसीआयने २०२१-२०२२ या वर्षांत खेळवल्या जाणाऱ्या स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक जाहिर केले आहे. भारतीय स्थानिक क्रिकेटर्सना दिलासा देणारी एक मोठी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केली आहे.

    या वेळापत्रकानुसार भारतीय क्रिकेटपटू वर्षभरात तब्बल २ हजार १२७ सामने खेळणार आहेत. या नव्या क्रिकेट वर्षाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने (Syed Mushtaq Ali Trophy) होणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) यंदा १६ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून पुढील ३ महिने चालणार आहे.

    बीसीसीआयने आज या नव्या क्रिकेट वर्षाची घोषणा केली. या क्रिकेट वर्षाला ऑक्टोबर २०२१ पासून सीनियर महिला वन डे लीग आणि सीनियर महिला वन डे चॅलेंजर्स ट्रॉफीनं सुरुवात होणार आहे. या वर्षभरात घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धांदरम्यान खेळाडूच्या प्रकृतीबाबतची सर्व काळजी घेतली जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

    बीसीसीआने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ सीजनमध्ये सर्व वयांतील खेळाडूंचे मिळून २ हजार १२७ सामने खेळवले जाणार आहेत. ज्यात सर्वांत अधिक काळ रणजी ट्रॉफीची स्पर्धा चालणार आहे.