एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची बीसीसीआयकडून घोषणा ; कृणाल पांड्यासह ‘या’ खेळाडूंना दिली संधी

सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्यासह अनेक उत्तम आणि चांगल्या खेळाडूंचा समावेश संघात करण्यात आला आहे. तसेच टी नटराजन, भुवनेश्वर कुमार वन डे संघात पुनरागमन करणार आहेत. एकदिवसीय मालिकेचे सामने २३, २६ आणि २८ मार्चला पुण्यात होणार आहेत.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेचे सामने पूर्ण झाल्यानंतर आता बीसीसीआयने एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्यासह अनेक उत्तम आणि चांगल्या खेळाडूंचा समावेश संघात करण्यात आला आहे. तसेच टी नटराजन, भुवनेश्वर कुमार वन डे संघात पुनरागमन करणार आहेत. एकदिवसीय मालिकेचे सामने २३, २६ आणि २८ मार्चला पुण्यात होणार आहेत.

    एकदिवसीय मालिकेसाठी अशी असेल टीम इंडिया

    टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार) , शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर.