भारत विरूद्ध इंग्लंड मालिका कुठे होणार? बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी सांगितलं असं काही…

दुबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गांगुली (BCCI President Sourav Ganguly ) म्हणाले की, इंग्लंड विरुद्धची मालिका भारतातच व्हावी यालाच आम्ही प्राधान्य देणार आहोत. भारतीय मैदानावरच हे सामने व्हावे याचा आम्ही प्रयत्न करू. भारतात क्रिकेट सुरु व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे परंतु आम्ही कोरोना व्हायरसच्या स्थितीवरही लक्ष ठेवत आहोत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

दुबई : आयपीएलच्या १३ व्या (IPL 2020)  हंगामानंतर आगामी वर्षात जानेवारी आणि मार्च दरम्यान भारत विरूद्ध इंग्लंड (India Vs England  ) यांच्यात मालिका होणार आहे. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर (Corona Virus) ही मालिका भारतात होणार की भारताबाहेर होणार याबद्दलची अजून कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मालिका भारतातच व्हावी याला प्राधान्य

दुबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गांगुली (BCCI President Sourav Ganguly ) म्हणाले की, इंग्लंड विरुद्धची मालिका भारतातच व्हावी यालाच आम्ही प्राधान्य देणार आहोत. भारतीय मैदानावरच हे सामने व्हावे याचा आम्ही प्रयत्न करू. भारतात क्रिकेट सुरु व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे परंतु आम्ही कोरोना व्हायरसच्या स्थितीवरही लक्ष ठेवत आहोत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

बीसीसीआयने अलीकडेच अमिरात क्रिकेट बोर्डाशी सामंजस्य करार केला होता. आमच्याकडे मुंबईत सीसीआय, वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियम देखील आहेत. आमच्याकडे ईडन गार्डन देखील आहे. आम्हाला बायो बबल (जैव-सुरक्षित वातावरण) तयार करावे लागेल. मागील सहा महिने प्रत्येक कामासाठी कठीण होते. सामान्य जीवन परत सुरु झाले पाहिजे असे खेळाडूंनाही वाटते, पण आपण कोव्हिड-१९च्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवायला हवी. असे सौरव गांगुली म्हणाले.