विराट कोहलीच्या कर्णधारपदावर गदा ? जय शहा यांचे मोठे वक्तव्य

कोहलीने ऑस्ट्रेलियातील कसोटी विजयानंतर संघ व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे मर्यादित षटकांच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते. दरम्यान कर्णधारपदावरुन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

    भारताचा कर्णधार आणि रनमशीन विराट कोहली टी-२० वर्ल्डकपनंतर मर्यादित षटकांच्या प्रकारात भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार नाही. कोहली स्वत:हून कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या भारतीय संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ३२ वर्षीय कोहली नेतृत्व करतो. पण नेतृत्वाचे विभाजन करण्यास, तो उत्सुक असल्याची माहिती मिळत आहे.

    कोहलीने ऑस्ट्रेलियातील कसोटी विजयानंतर संघ व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे मर्यादित षटकांच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते. दरम्यान कर्णधारपदावरुन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

    टी-२० विश्वचषकासाठी फक्त एक महिना शिल्लक असून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कर्णधार विराट कोहलीच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले आहे. संघ जोपर्यंत मैदानात चांगली कामगिरी करत आहे, तोपर्यंत कर्णधारपदात बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जय शहा यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.